
समांतर क्रांती / खानापूर
कर्नाटकी कन्नड सक्तीविरोधात 11 ऑगस्ट रोजी भव्य मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार खानापूर तालुका म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोपाळ देसाई होते.

सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश विषद केला. त्यानंतर बेळगाव महानगरपालिकेत मराठी अस्मिता दाखविलेल्या तिन्ही मराठी नगरसेवकांचे अभिनंदन करणारा ठराव पारित करण्यात आला. झालेल्या भाषणात समिती नेते व कार्यकर्त्यांनी बेळगावच्या मोर्चाला पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, सुधीर पाटील, जयराम देसाई, बाळासाहेब शेलार, पांडुरंग सावंत, राजाराम देसाई, वसंत नावलकर, भीमसेन करंबळकर यांनी विचार मांडले.
बैठकीनंतर खानापूर शहरात जागृती फेरी काढून पत्रकांचे वाटप करण्यात आले. नागरिकांना बेळगावच्या कन्नड सक्तीविरोधी मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रसंगी जागृती फेरीत माजी आमदार दिगंबर पाटील, गोपाळ देसाई, मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी, विठ्ठल गुरव, संजय पाटील, रणजीत पाटील, मारुती परमेकरआदिसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी मराठी भाषीकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.


आमदार विठ्ठल हलगेकर यांना युवा समितीकडून निवेदन.. काय म्हणाले आमदार?
समांतर क्रांती / खानापूर म.ए.युवा समितीच्यावतीने कन्नडसक्ती मागे घेण्यात यावी या मागणीचे निवेदन आज सोमवारी (ता. ०४) आमदार विठ्ठल हलगेकर यांना देण्यात आले. Memorandum from the M.E.S.Youth Committee to MLA Vitthal Halgekar.. एका कार्यक्रमाच्या ठिकाणी आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेण्यात आली. यावेळी बोलतांना युवानेते शुभम शेळके यांनी कर्नाटक शासनाकडून सीमाभागात कन्नडसक्ती लागू करण्यात आल्याने […]