समांतर क्रांती / जांबोटी
कर्नाटक सरकारने बेळगावसह संपूर्ण सीमा भागात कन्नडसक्ती लागू करण्याचे धोरण अवलंबले आहे. मराठी भाषिकांचे घटनात्मक अधिकार हिरावून घेतले जात आहेत. भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार मराठी भाषिकांना कानडीबरोबर मराठीमधूनही सरकारी परिपत्रके उपलब्ध करून द्यावी. सक्तीचे कानडीकरण थांबवावे या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवारी (ता.11) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे.
मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने मराठी भाषिकानी सहभागी होऊन आपली ताकद दाखवावी, यासाठी मंगळवारी (ता. 5) खानापूर तालुका म ए समितीच्यावतीने जांबोटी येथे जागृती फेरीचे आयोजन करून, पत्रकांचे वाटप करण्यात आले.
मराठी अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार जांबोटी भागातील नागरिकांनी व्यक्त केला. जागृती फेरीमध्ये खानापूर तालुका म ए समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, म ए समितीचे नेते राजाराम देसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, माजी सभापती मारुती परमेकर ,माजी ता प सदस्य पांडुरंग नाईक, मध्यवर्ती म ए समिती सदस्य वसंत नावलकर, रवींद्र शिंदे, बाबुराव भरणकर, राजू चिखलकर, विठ्ठल देसाई, रवींद्र देसाई, हणमंत जगताप, चंद्रकांत बैलूरकर यांच्यासह बहुसंख्य मराठी भाषिक सहभागी झाले होते.

कामतगा येथे गणेश मूर्ती बनविण्यास वेग
समांतर क्रांती / खानापूर गणेश चतुर्थी अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली असून गणेश मूर्तिकारांच्या हाताला यंत्राची गती आली आहे. पावसामुळे मूर्ती बनविण्यात येत असलेला व्यत्यय यामुळे यंदा मूर्तिकाम रोडवले असल्याने सध्या मूर्तिकारांची घाई चालली आहे. कामतगा येथील मूर्तिकार बबन पांडुरंग सुतार यांच्या मूर्ती शाळेत त्यांचे कुटुंब यंत्राच्या वेगाने कामाला लागले आहे. खानापूर तालुक्यातील अनेक गावात […]