समांतर क्रांती / खानापूर
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक गुरुवारी (ता. २५) दुपारी २ वाजता राजा शिवछत्रपती स्मारकात बोलावण्यात आली आहे. तरी म. ए. समितीचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांनी वेळेत हजर रहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, माजी आमदार दिगंबर पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.

.. तर आमदार हलगेकरांनी राजीनामा देण्याची तयारी ठेवावी; कुणी दिले आव्हान?
समांतर क्रांती / खानापूर भाजपने आज बुधवारी (ता. 24) सरकारकडून विकास कामात सहकार्य मिळत नसल्याच्या निषेधार्थ रस्तारोको केला. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. पण, त्यांच्यासमोर आता वेगळेच आव्हान उभे ठाकले आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी काँग्रेसच्या माजी आमदार तालुक्याच्या विकासात आडकाठी करीत असल्याचा आरोप केला होता. त्या आरोपाला प्रत्युत्तर देताना […]