
समांतर क्रांती / खानापूर
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्यावतीने कन्नडसक्ती संदर्भात विविध लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात येत आहे. आतापर्यंत पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, खासदार जगदीश शेट्टर यांच्या भेटी घेऊन निवेदन सादर करण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने उद्या सोमवारी (ता. 04) सकाळी ११-०० वाजता खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांना निवेदन देण्यात येणार आहे. तरी बेळगाव येथून निघणाऱ्या मराठी भाषिकांनी उद्या सोमवारी सकाळी साडेदहा पर्यंत मराठी मंदिर कार्यालय येथे जमा होऊन खानापूरला जायचे आहे.
खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने शांतिनिकेतन पब्लिक स्कूल येथे ठिक ११ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कन्नडसक्ती मोर्चाची खानापूरात पत्रके वाटून जागृती
समांतर क्रांती / खानापूर कर्नाटकी कन्नड सक्तीविरोधात 11 ऑगस्ट रोजी भव्य मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार खानापूर तालुका म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोपाळ देसाई होते. सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश विषद केला. त्यानंतर बेळगाव महानगरपालिकेत मराठी अस्मिता दाखविलेल्या तिन्ही […]