समांतर क्रांती / खानापूर
भाजपने आज बुधवारी (ता. 24) सरकारकडून विकास कामात सहकार्य मिळत नसल्याच्या निषेधार्थ रस्तारोको केला. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. पण, त्यांच्यासमोर आता वेगळेच आव्हान उभे ठाकले आहे.
दोन दिवसांपूर्वी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी काँग्रेसच्या माजी आमदार तालुक्याच्या विकासात आडकाठी करीत असल्याचा आरोप केला होता. त्या आरोपाला प्रत्युत्तर देताना माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी थेट आमदार विठ्ठल हलगेकर यांना आव्हानच दिले असून आता ते यावर कसे व्यक्त होणार? की जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीप्रमाणे यावेळी सुद्धा गुढगे टेकणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
‘मी माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात भाजपचे सरकार असताना सुद्धा भांडून खानापूर तालुक्यासाठी अनेक प्रकल्प मंजूर करून घेतले. त्यामुळे सर्वासामान्यांच्या समस्या सुटल्या. आमदार हलगेकर आता काँग्रेस सरकार आणि माझ्यावर निधी देत नसल्याबद्दल आरोप करीत आहेत. खरंतर हा त्यांच्या निष्क्रिय कामकाजाचा परिणाम आहे. तालुक्याच्या विकासासाठी ते म्हणतील तेव्हा, म्हणतील मुख्यमंत्र्यांना भेटून शिफारस करायला तयार आहे.’ असे म्हटले आहे. शेवटी त्यांनी मी कुणाही मंत्र्यांना काही सांगितले नाही, आमदारांचा आरोप खोडसाळ असून त्यांनी तो सिद्ध करावा, अन्यथा आमदारकीचा राजीनामा देऊन राजकारणातून सन्यास घ्यावा, असे थेट आव्हानच त्यांनी दिले आहे.

खानापूरच्या बाजारपेठेला परप्रांतीयांचा विळखा
समांतर क्रांती / विशेष खानापूरच्या बाझारपेठेत परप्रांतीयांची संख्या झपाट्याने वाढत असून स्थानिक व्यापारी संकटात सापडले आहेत. किराणा मालाच्या दुकानापासून ते केशकर्तनालयापर्यंत सर्वच ठिकाणी गुजराती लोकांनी बस्तान बसविले आहे. त्याशिवाय त्यांच्याकडून अतिक्रमण होत असल्याची भावना स्थानिकांत आहे. शहरातील रविवार पेठेत चार-पाच वर्षांपूर्वीपर्यंत स्थानिक लिंगायत, मुस्लिमआणि मराठा व्यापाऱ्यांचे वर्चस्व होते. तेथेही परप्रांतीय व्यापाऱ्यांनी जम बसविला आहे. तर […]