समांतर क्रांती / खानापूर
तालुक्यातील मोदेकोप्प येथे ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आले. यावेळी जवान मोनेश्री लोकोळकर व विनोद गावडे यांच्याहस्ते ध्वजरोहण झाले. याप्रसंगी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष मनोहर गावडा, कल्लाप्पा गावडे, वसंत केसरेकर, मष्णू पाटील, शिवाजी लोकोळकर, तुकाराम कुलम, शिक्षक एम.आर.पाटील आदींसह पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.


Accident : यल्लापूरजवळ तीन ठार, सात जखमी
कारवार: शुक्रवारी रात्री उशिरा येल्लापूरमधील मावल्ली क्रॉसजवळ झालेल्या अपघातात केएसआरटीसी बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लॉरीला धडकली, त्यात तीन जण जागीच ठार झाले तर सात जण गंभीर जखमी झाले. मृतांची ओळख पटली आहे. बागलकोट येथील निलव्वा हरदोल्ली (४०) आणि जालिहाळ गावातील गिरिजव्वा बुडन्नावर (३०) अशी त्यांची नावे आहेत. आणखी एका मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. […]