
प्रियसीचा खून करून प्रियकराची आत्महत्या; चाकूने केले सपासप वार
समांतर क्रांती / खानापूर
प्रियकराने प्रियसीवर चाकूने सपासप वार करून ठार केले. नंतर स्वत:वरही चाकूने वार करून घेत आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील बिडी येथे घडली आहे. मृत महिलेचे नाव रेश्मा तिरवीर (२९) व प्रियकराचे नाव आनंद सुतार असे असून दोघांमध्ये गेल्या कांही वर्षांपासून अनैतिक संबंध सुरू होते.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, आनंद सुतार आणि रेश्मा यांचे अनैतिक संबंध असल्याबद्दल अलिकडेच तिच्या पतीने नंदगड पोलिसात तक्रार केली होती. पोलिसांनी त्याला समज देऊन सोडले होते. त्याच राहातून त्याने रेश्माच्या घरी जाऊन तिच्यावर चाकूने सपासप वार केले. त्यात ती जागीच ठार झाली. त्यानंतर त्याच चाकूने आनंद याने स्वत:वर वार केले. त्याला जखमी आवस्थेत बेळगावला उपचारासाठी नेत असतांना त्याचा वाटेत मृत्यू झाला.
दोघेही विवाहित..
मृत रेश्मा व आनंद हे दोघेही विवाहीत आहेत. रेश्मा हिला दोन तर आनंदला तीन मुले आहेत. अनैतिक संबंधाने दोन सुखी संसारांची राखरांगोळी झाली आहे. या घटनेने बिडी परिसरात खळबळ माजली आहे. पोलिस उपअधिक्षक विरेश हिरेमठ यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. घटनेची नोंद नंदगड पोलिसांत झाली असून अधिक तपास सुरू आहे.


मणतुर्गा मराठी शाळेच्या नुतनीकरणाचा स्वातंत्र्यदिनी संकल्प
समांतर क्रांती / खानापूर अनेक दशकांपासून हजारो विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या मणतुर्गा येथील मराठी शाळेच्या इमारतीचे नुतनीकरण करण्याचा संकल्प आज शुक्रवारी (ता.१५) स्वातंत्र्यदिनी करण्यात आला. यावेळी शाळा सुधारणा समितीच्या सदस्यांनी शाळेच्या उभारणीसाठी देणग्या दिल्या. स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेच्या आवारात शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष ईश्वर बोबाटे यांच्याहस्ते करण्यात आले. तर महात्मा गांधीच्या प्रतिमेचे पूजन उपाध्यक्ष नारायण पाटील व डॉ. बाबासाहेब […]