समांतर क्रांती / बेळगाव

चाकूने सपासप वार करून महिलेचा खून करण्यात आल्याची घटना टिळकवाडीतील मंगळवार पेठेत आज बुधवारी (ता.१०) सकाळी आठच्या सुमारास घडली. गिता रणजीत गवळी (५५) असे या महिलेचे नाव असून या प्रकरणी तिचा दीर गणेश गवळी याला ताब्यात घेतले आहे. सदर खून मालमत्तेच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतदेह शवचिकीत्सेसाठी सिव्हील इस्पितळात पाठविण्यात आला आहे. या खून प्रकरणाने टिळकवाडीत खळबळ माजली आहे.


तज्ज्ञ समितीसमोर म.ए.युवा समिती शिष्टमंळानेमांडल्या सीमावासीयांच्या व्यथा
समांतर क्रांती / मुंबई बेळगावसह सीमाभागातील मराठी माणूस हा गेली सत्तर वर्षे येथील कर्नाटक सरकार व प्रशासनाकडून होणाऱ्या भाषिक अत्याचाराचा बळी ठरत आला आहे, कर्नाटकी प्रशासनाकडून फक्त कन्नड भाषेची सक्ती केली जाते असं नाही, तर लोकशाही मार्गाने दिलेले भाषिक हक्क डावलून येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते व कार्यकर्त्यांवर येनकेण प्रकारे गुन्हे दाखल केले जातात, काही […]