समांतर क्रांती / खानापूर
टिळकवाडी (बेळगाव) येथील दीराने वहिनीवर चाकूने तब्बल २० वार करून खून केल्याची घटना काल बुधवारी (ता.१०) घडली होती. त्यानंतर आज गुरूवारीला (ता.११) जोयडा तालुक्यातील शिंगरगाव पंचायत क्षेत्रात येणाऱ्या आमशेत – कोलेमाळ येथे दिराने वहिनीचा डोक्यात फावडे मारून खून केल्याची धक्कादायक घटना सकाळी घडली आहे. या घटनेने जोयडा तालुका हदरून गेला आहे.
खुनात मृत झालेल्या महिलेचे नाव भाग्यश्री सोनू वरक(35) असे आहे. खून करून संशयित आरोपी धोंडू गंगाराम वरक (56) हा फरार झाला आहे.
खुनाची माहिती मिळताच रामनगर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी फॉरेन्सिक टीमच्या सहकार्याने या घटनेचा पंचनामा केला. फरार संशयित धोंडू वरक यांचा रामनगर पोलीस शोध घेत आहेत. त्याचा शोध रामनगर पोलीस घेत आहेत. दरम्यान रामनगर पोलीस स्थानाकात या प्रकरण दाखल झाले आहे. कौटुंबीक वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक चर्चा आहे.

अल्पवयीन तरूणीवर अत्याचार; ‘खानापुरा’तील तरूणास २० वर्षांचा सश्रम कारावास
समांतर क्रांती / खानापूर Torture of minor girl; Youth from ‘Khanapura’ gets 20 years imprisonment अल्पवयीन तरूणीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी तरूणास २० वर्षांचा सश्रम कारावास आणि २० हजारांचा दंड अशी शिक्षा न्यायालयाने बजावली आहे. सदर प्रकरण २०२२ मध्ये घडले होते. अशोकनगर (ता. खानापूर) येथील प्रकाश सत्याप्पा मगदूम (२६) याने २०२२ साली एका अल्पवयीन तरूणीवर लैंगिक […]