समांतर क्रांती / रामनगर
कुळाचारावरून वहिनीचा निर्घूण करून पसार झालेल्या आमशेत येथील धोंडू गंगाराम वरक (५५) याला अखेर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. तो कृष्ण नगराजवळील जंगलात लपून बसला होता.
आमशेत (ता. जोयडा) येथे गुरूवारी (ता. ११) भाग्यश्री सोनू वरक (३५) हिच्या डोक्यात फावड्याने घाव घालून धोंडू याने खून केला होता. या घटनेने संपूर्ण जोयडा तालुका हादरून गेला होता. दरम्यान, धोंडू हा दोन दिवसांपासून फरारी होता. त्याला आज शनिवारी (ता. १३) रामनगर पोलिसांनी अटक केली.
कुळाचारावरून त्यांच्यात अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. सोनू ही आपल्या कुटुंबावर चेटूक करते, असा संशय धोंडूला होता. त्यातून त्याने टोकाचा निर्णय घेत खून केला. त्यानंतर तो फरारी झाला होता. तो खानापूर तालुक्यातील नागरगाळी जवळच्या जंगलात लपून बसला होता. उपाशीपोटी असल्याने त्याची प्रकृती बिघडली होती. मिळालेल्या माहितीवरून रामनगर पोलिसांनी त्याला जंगलातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला रामनगर आरोग्य केंद्रात दाखल करून उपचर करण्यात आले. त्याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.

अर्बन बँकेच्या सर्वसाधारण सभेत नेमकं काय घडलं?
समांतर क्रांती / खानापूर विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या खानापूर को-ऑप बँकेची सर्वसाधारण सभा वादळी ठरणार अशी चर्चा होती. त्यानुसार काल शनिवारी (ता. १३) झालेली सभा प्रचंड गदारोळात पार पडली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माजी आमदार अरविंद पाटील यांनी हस्तक्षेप करून शतकोत्तर वाटचाल करीत असलेल्या बँकेतील वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिल्याने सभा कांही […]