समांतर क्रांती / बेळगाव
बसमधून उतरून कामावर जात असतांना तरूणावर चाकुने सपासप वार करून हत्या करण्यात आल्याची घटना आज गुरूवारी (ता.१८) सकाळी अथणी तालुक्यातील शहाबंदर येथे घडली आहे. महांतेश बुकनट्टी (२४) असे त्याचे नाव असून त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्यावरून ही हत्या झाल्याचे समजते.
हल्लेखोरांनी चाकुने सपासप वार केल्यानंतर महांतेश हा जागीच कोसळला. त्यानंतर हल्लेखोरांनी चाकू घटनास्थळी टाकून पळ काढला. यमकनमर्डी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे.

खानापूर आगार व्यवस्थापकाकडून आमदारांच्या सूचनांना वाटाण्यांच्या अक्षता
समांतर क्रांती / खानापूर आठ दिवसांपूर्वीच आमदार विठ्ठल हलगेकर यांनी येथील बस आगार व्यवस्थापकांना तालुक्यातील बससेवा सुरळीत करण्याची सूचना केली होती. पण, आगार प्रमुखांनी त्यांच्या सूचनांना चक्क वाटाण्याच्या अक्षता लावल्या असून आमदारांचा अधिकाऱ्यांवर वचक नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. बस सोडण्याची मागणी करीत आगार प्रमुखांकडे गेलेल्या विद्यार्थ्यांना आज शुक्रवारी आगाराच्या गेटवरून अक्षरश: हाकलून लावण्यात […]