समांतर क्रांती / खानापूर माणिकवाडी येथील तरूण व्यंकाप्पा मल्हारी मयेकर (१८) याला मारहाण करून खून केलेल्या संशयीत आरोपींना १५ दिवसानंतरही अटक करण्यात आली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. खानापूर पोलिसांच्या कार्यपध्दतीवर संशय व्यक्त करीत माणिकवाडी ग्रामस्थानी जिल्हा पलिस प्रमुखांना निवेदन सादर करून संशयीतांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. १४ ऑगस्ट रोजी रुमेवाडी येथील […]
समांतर क्रांती / खानापूर अनमोड घाटातील रस्ता खचल्यामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी सर्व प्रकारची वाहतूक बंद केली होती. मात्र, सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी शुद्धीपत्रक जारी करत अत्यावश्यक सेवा देणारी वाहने, सहाचाकी वाहतुकीसह अवजड वाहनांना परवानगी दिली आहे.दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या विभागाला सहा आणि चाकी वाहनांची वाहतूक […]
समांतर क्रांती / खानापूर तालुक्यातील प्रत्येक सरकारी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पोहोचविण्याचे चांगले कार्य महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास निश्चित मदत होईल, असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यापासून खानापूर तालुक्यातील सरकारी मराठी शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वितरण […]
समांतर क्रांती / खानापूर आठ दिवसांपूर्वीच आमदार विठ्ठल हलगेकर यांनी येथील बस आगार व्यवस्थापकांना तालुक्यातील बससेवा सुरळीत करण्याची सूचना केली होती. पण, आगार प्रमुखांनी त्यांच्या सूचनांना चक्क वाटाण्याच्या अक्षता लावल्या असून आमदारांचा अधिकाऱ्यांवर वचक नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. बस सोडण्याची मागणी करीत आगार प्रमुखांकडे गेलेल्या विद्यार्थ्यांना आज शुक्रवारी आगाराच्या गेटवरून अक्षरश: हाकलून लावण्यात […]
समांतर क्रांती / बेळगाव बसमधून उतरून कामावर जात असतांना तरूणावर चाकुने सपासप वार करून हत्या करण्यात आल्याची घटना आज गुरूवारी (ता.१८) सकाळी अथणी तालुक्यातील शहाबंदर येथे घडली आहे. महांतेश बुकनट्टी (२४) असे त्याचे नाव असून त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्यावरून ही हत्या झाल्याचे समजते. हल्लेखोरांनी चाकुने सपासप वार केल्यानंतर महांतेश हा जागीच कोसळला. त्यानंतर […]
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर छ.शिवराय आणि छ. संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भीमगड अभयारण्यातील कृष्णापूर ते वाळपई रस्त्याला दांडगा इतिहास लाभला आहे. शेकडो वर्षांपासून गोवा आणि खानापूरचे संबंध जोपासणारा हा मार्ग आता लवकरच बंद होणार आहे. लोंढा ते वास्को हा रेल्वे मार्ग आणि अनमोड आणि चोर्ला घाटातील महामार्ग सुरू होण्यापूर्वी गोव्याशी खानापूरचे दृढ संबंध […]
समांतर क्रांती / पणजी Aerial survey of Mhadei will be conducted, assures Goa Chief Minister म्हादई प्रश्नावर सरकार गंभीर आहे. या प्रकरणी लवकर सुनावणी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात विशेष प्रयत्न केले जातील, तसेच प्रकल्पाचा एरियल सर्व्हे करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कर्नाटक सरकारशी बोलतील किंवा पत्रव्यवहार करतील, असे आश्वासन जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिले आहे. म्हादई […]
समांतर क्रांती / खानापूर काल मंगळवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास घराच्या बाहेर लावलेल्या होंडा व सुझुकी अशा दोन दुचाकी अज्ञातांनी जाळल्याची घटना घडली. यामुळे हंदूर परिसरात घबराट पसरली आहे. सद्दाम अस्लम सय्यद यांच्या या दोन दुचाकी होत्या. केवळ सुदैवाने घराने पेट न घेतल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच काँग्रेस नेते सुरेश जाधव यांनी हंदूर […]
समांतर क्रांती / खानापूर २२ सप्टेबरपासून राज्यभरात जातनिहाय जनगणना सुरू होणार असून खानापूर तालुक्यातील मराठा समाजाने स्वत:ची माहिती देतांना जात मराठा. उपजात कुणबी आणि भाषा मराठी असा उल्लेख करण्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आवाहन केले आहे. आज येथील शिवस्मारकात सकल मराठा समाजाची बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जातनिहाय जनगणनेसाठी ६० […]
समांतर क्रांती / खानापूर खानापूर हा वैशिष्ट्यपूर्ण तालुका असून येथील रेल्वे स्थानकाला पायाभूत सुविधा आणि विकासासाठी रू. ११ कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी दिली. येथील रेल्वे स्थानकावरील विकासकामांचे भूमीपूजन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी, आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील आदींसह […]