समांतर क्रांती / खानापूर डॉ. आंबेडकर ब्रिगेडची बैठक सोमवारी (ता.११) येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृहात पार पडली. बैठकीत ब्रिगेडचा संघटनात्मक विस्तार करण्याचा व शोषीत समाजाच्या समस्यांविरोधात आंदोलनास्त्र उगारण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी ब्रिगेडचे संस्थापक लक्ष्मण मादार होते. अर्जून कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. त्यानंतर बोलतांना अध्यक्ष लक्ष्मण मादार म्हणाले, तालुक्यातील दलित मागास समाजांवरील […]
समांतर क्रांती / बेळगाव कन्नडसक्तीविरोधात आज सोमवारी (ता.११) जिल्हाधिकारी महमद रोशन यांना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले. मोर्चा न काढण्याची विनंती पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी केली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांनी अश्वासक भूमिका घेत मराठी भाषीकांच्या हक्क आणि अधिकारांवर गदा येणार […]
समांतर क्रांती / खानापूर शहराच्या विविध भागात घरफोड्या केल्याच्या आरोपावरून दोघांना पोलिसांनी मुद्देमालासह अटक करून त्यांची रवानगी कारागृहात केली आहे. दीपक उर्फ रोहन नागेंद्र मातंगी (मूळचा हलकर्णी-खानापूर सध्या रा. मच्छे) व शिवनागय्या मतय्या उमचगीमठ (मूळचा गुजमागडी-गदग सध्या रा. हुबळी) अशी या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ८६.०६ ग्रॅम सोन्याचे व चांदीचे दागिणे जप्त करण्यात आले आहेत. […]
समांतर क्रांती / खानापूर होनकल केंद्र पातळीवरील क्रीडा स्पर्धा 2025-26 पूर्ण प्राथमिक मराठी शाळा रुमेवाडी येथे नुकताच संपन्न झाल्या. यावेळी झालेल्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष गणेश हल्याळकर होते. यावेळी मणतुर्गा शाळा सुधारणा समिती अध्यक्ष ईश्वर बोबाटे, समुह संपन्मूल व्यक्ती मुल्ला यांच्यासह होनकल केंद्रातील शाळांचे एसडीएसमसी अध्यक्ष, सदस्य आणि मुख्याध्यापकांसह शिक्षक उपस्थित होते. […]
खानापूर : मुगळखोड (ता. मुधोळ जि. बागलकोट) येथे नुकताच झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ३८ किलो वजन गटात मोदेकोप (ता. खानापूर) येथील पार्थ मनोहर गावडा याने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. मुगळखोड येथे पहिल्यांदाच पुरुष व महिलांसाठी राज्य पातळीवरील मॅट कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पार्थ गावडा याने यापूर्वी राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक कुस्ती स्पर्धेत […]
समांतर क्रांती / खानापूर The government crisis is once again over the villages of Karambal and Rumewadi, which have hundreds of lost acres of land.बेळगाव-पणजी महामार्ग निर्मितीत शेकडो एकर जमिन गमावलेल्या करंबळ आणि रुमेवाडी गावांवर पुन्हा एकदा सरकारी संकट येऊ घातले आहे. नियोजीत भांडूरा प्रकल्पासाठी करंबळ, रुमेवाडी, शेडेगाळी आणि आसोगा येथील जमिनींचे संपादन करण्याची अधिसूचना […]
समांतर क्रांती / जोयडा रेल्वेच्या धडकेत नऊ वर्षे वयाच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना कारवारजवळील थोडुरू येथे घडली. मालगाडीने धडक दिल्याने ही घटना घडल्याचे वनक्षेत्रपाल गजानन नायक यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी ही घटना घडली. वनधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर मृत बिबट्याचे कलेवर दफन करण्यात आले. या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
खानापूरात तरुणाची आत्महत्यासमांतर क्रांती / खानापूर17 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी (ता. 10) घडली आहे. अकरावीत शिकणाऱ्या तरुणाने आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट न झाल्याने खळबळ माजली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी,बाहर गल्लीत भाड्याच्या घरात राहणाऱ्या रेहान हेब्बळी (17) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेईन आत्महत्या केली. त्याने गळफास घेतल्याचे […]
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर Karnataka Govt anti-constitutional कानडीकरणाचा वरवंटा गेल्या ७० वर्षांपासून मराठी माणसावरून फिरविल्यानंतरही कर्नाटकी कंडू शमलेला नाही. त्याची प्रचिती सीमावासीय मराठी भाषीकांना वारंवार येत असतेच. त्यातही गेल्या महिनाभरात कानडीकरणाच्या सक्तीने सरकारचा संविधानद्रोह उघडा पाडला आहे; शिवाय प्रशासनाचा बेदरकारपणा सुध्दा चव्हाट्यावर आला आहे. भारतीय प्रशासकीय सेवा आणि भारतील पोलिस सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना संविधानीक […]
समांतर क्रांती / खानापूर गेल्या कांही दिवसांपासून कणकुंबी भागात मंदिरांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. एका पाठोपाठ चोऱ्या होत असल्याने गावकऱ्यात भीतीचे वातावरण आहे. पोलिस मात्र केवळ पंचनामा करून वेळ मारून नेत आहेत. चोरट्यांना तात्काळ जेरबंद करण्याची मागणी जोर धरत आहे. महिनाभरापूर्वी चिगुळे येथील मंदिरातील दोन दानपेट्या फोडून चोरट्यांनी रक्कम पळविली होती. ही घटना ताजी असतानाच […]