समांतर क्रांती / खानापूर खानापूर तालुक्यातील कृषीपत्तीन संघांना २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा करीत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी चालविली आहे. परंतू, त्यांच्या या घोषणेमुळे तालुक्यातील जनतेतून त्यांचे कौतूक होण्याऐवजी टीका केली जात आहे. काँग्रेसने सुध्दा यावरून आमदारांवर हल्लाबोल केला आहे तर सोशल मिडियावर टीकांची झोड उठली आहे. कृषीपत्तीन […]
समांतर क्रांती / खानापूरशेतात फिरायला गेलेल्या तरुणाचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील इडलहोंड येथे आज गुरुवारी (ता. 7) घडली. दिग्विजय मनोहर जाधव (36) असे या तरुणाचे नाव असून माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांचा तो मामेभाऊ होता. दिग्विजय हा पिसेदेव पतसंस्थेच्या गर्लगुंजी शाखेत कामाला होता. आज तो […]
समांतर क्रांती / खानापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस-भाजप युती निश्चित झाली आहे. त्याची घोषणादेखील झाली. आमदार विठ्ठल हलगेकर आणि आमदार चन्नराज हट्टीहोळ्ळी यांनी गळ्यात गळे घालून मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. तालुक्यातील समस्यांकडे अजिबात लक्ष नसलेल्या या द्वयींनी कृषीपत्तीन संघांच्या संचालकांवर अश्वासनांची खैरात सुरू केल्याची चर्चा जोरात रंगली असून त्यांना अनेक अनपेक्षित अनुभवांना सामोरे जावे […]
समांतर क्रांती / खानापूर नाल्याचे पाणी कचानक वाढल्यामुळे वाटरमन दुचाकीसह वाहून गेल्याची घटना खानापूर तालुक्यात घडली आहे. घटनेची नोंद हिरेबागेवाडी पोलिसात झाली आहे. गाडीकोप्प येथील वाटरमन सुरेश निजगुणी गुंडेन्नावर (34) हे चंदनहोसूर येथील नादुरुस्त जलवाहिनी दुरुस्त करून गावी परतत असताना नाल्यातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. पाण्याचा अंदाज न आल्याने ते त्यात दुचाकीसह वाहून गेले, असे […]
समांतर क्रांती / खानापूर गणेश चतुर्थी अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली असून गणेश मूर्तिकारांच्या हाताला यंत्राची गती आली आहे. पावसामुळे मूर्ती बनविण्यात येत असलेला व्यत्यय यामुळे यंदा मूर्तिकाम रोडवले असल्याने सध्या मूर्तिकारांची घाई चालली आहे. कामतगा येथील मूर्तिकार बबन पांडुरंग सुतार यांच्या मूर्ती शाळेत त्यांचे कुटुंब यंत्राच्या वेगाने कामाला लागले आहे. खानापूर तालुक्यातील अनेक गावात […]
समांतर क्रांती / जांबोटी कर्नाटक सरकारने बेळगावसह संपूर्ण सीमा भागात कन्नडसक्ती लागू करण्याचे धोरण अवलंबले आहे. मराठी भाषिकांचे घटनात्मक अधिकार हिरावून घेतले जात आहेत. भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार मराठी भाषिकांना कानडीबरोबर मराठीमधूनही सरकारी परिपत्रके उपलब्ध करून द्यावी. सक्तीचे कानडीकरण थांबवावे या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवारी (ता.11) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. […]
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर Khanapur: Building that served patients for 60 years razed to the ground माणसाच्या अपेक्षा इतक्या वाढल्या आहेत की, विकासाच्या नावाखाली इतिहास पुसला जात आहे. दशकानुदशके दु:ख, आनंद, वेदनांच्या आठवणी कवेत घेऊन उभ्या असणाऱ्या शासकीय इमारती जमिनदोसस्त होत आहेत. पण, त्याचे कुणालाच कांही वाटत नाही. एकेकाळी लोकवर्गणीतून उभी राहिलेली खानापूर शहरातील […]
समांतर क्रांती / नंदगड सर्पदंशाने सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नंदगड येथील कुंभार गल्लीत घडली आहे. वेदांत सतीश गडकरी असे या दुर्देवी बालकाचे नाव आहे. वेदांत हा रात्री झोपेत असतांनाच अंथरूणात सापाने दंश केला होता. त्याला तात्काळ बेळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांचा उपयोग न झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. […]
समांतर क्रांती / खानापूर मानसिक अस्वस्थतेतून महिलेने हालात्री नाल्यात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी (ता. ५) सकाळी उघडकीस आली. लक्ष्मी नारायण पाटील (वय ६५, रा. हारूरी) असे या महिलेचे नाव असून गेल्या कांही वर्षांपासून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले होते. याबाबतची अधिक माहिती अशी, लक्ष्मी यांची मानसिक स्थिती ठिक नव्हती. त्यांच्यावर उपचारदेखील सुरू होते. […]
समांतर क्रांती / खानापूर खानापूर शहरांतर्गत महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे प्रवाशांचे जीव कवडीमोल बनले आहेत. दररोज घडणाऱ्या अपघातांनी प्रवाशी त्रस्त आहेत. मात्र, पाऊस थांबल्यानंतरही खड्डे भरण्यास संबंधीत खात्याकडून हयगय केली जात आहे. पाऊस संपल्यानंतर रस्त्यांची डाडुजी करू, अशी ग्वाही देणाऱ्या आमदारांनी सुध्दा पाठ फिरविल्याचे दिसत असल्याने नागरीकांतून संताप व्यक्त होत आहे. न्यायालय ते रुमेवाडी क्रॉस व […]