समांतर क्रांती / खानापूर तरुण अभियांत्यावर चाकू हल्ला करून खून करण्यात आल्याच्या घटनेतील तिन्ही संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी बजावल्याने त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. रविवारी (ता. 3) गांधीनगर -खानापूर येथे अभियंता सुरेश उर्फ रमेश तिमाप्पा बंडीवड्डर (32) याचा निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी मुख्य संशयीत आरोपी यल्लाप्पा शांताराम बंडीवड्डर (62), त्याची पत्नी […]
नंदगड : कसबा नंदगड (ता. खानापूर) येथील वामन मन्नप्पा लोहार (वय 55) यांचे आज सोमवारी (ता.4) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, तीन भाऊ, पाच बहिणी, दोन मुलगे, विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते लाकडी कारागीर म्हणून प्रसिद्ध होते. कसबा नंदगड येथे सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंकार झाले. रक्षविसर्जन गुरुवारी (ता. 7) होणार आहे. […]
समांतर क्रांती / खानापूर म.ए.युवा समितीच्यावतीने कन्नडसक्ती मागे घेण्यात यावी या मागणीचे निवेदन आज सोमवारी (ता. ०४) आमदार विठ्ठल हलगेकर यांना देण्यात आले. Memorandum from the M.E.S.Youth Committee to MLA Vitthal Halgekar.. एका कार्यक्रमाच्या ठिकाणी आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेण्यात आली. यावेळी बोलतांना युवानेते शुभम शेळके यांनी कर्नाटक शासनाकडून सीमाभागात कन्नडसक्ती लागू करण्यात आल्याने […]
समांतर क्रांती / खानापूर कर्नाटकी कन्नड सक्तीविरोधात 11 ऑगस्ट रोजी भव्य मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार खानापूर तालुका म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोपाळ देसाई होते. सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश विषद केला. त्यानंतर बेळगाव महानगरपालिकेत मराठी अस्मिता दाखविलेल्या तिन्ही […]
समांतर क्रांती / खानापूरमहाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्यावतीने कन्नडसक्ती संदर्भात विविध लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात येत आहे. आतापर्यंत पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, खासदार जगदीश शेट्टर यांच्या भेटी घेऊन निवेदन सादर करण्यात आले आहे.त्या अनुषंगाने उद्या सोमवारी (ता. 04) सकाळी ११-०० वाजता खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांना निवेदन देण्यात येणार आहे. […]
समांतर क्रांती / खानापूर वाद मिटविण्यासाठी मंदिरात होत असलेल्या बैठकीतच पोटावर सपासप वार केल्याने तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना येथील गांधीनगर येथे आज रविवारी (३) चारच्या सुमारास घडली. सुरेश तिम्मान्ना बंडीवड्डर (वय ३२) असे मयत तरूणाचे नाव आहे. त्याच्यावर चाकू हल्ला करणारा यल्लाप्पा शांताराम बंडीवड्डर (६२) हा स्वत:हून पोलीस स्थानकात हजर झाला असून त्याला अटक करण्यात […]
समांतर क्रांती / खानापूर भांडण सोडविण्यासाठी चाललेल्या बैठकीतच एकावर चाकूहल्ला करण्यात आल्याची घटना शहरालगतच्या गांधीनगर येथे घडली आहे. जखमीला गंभीर आवस्थेत बेळगावला उपचारांसाठी रवाना करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. चाकू हल्ल्या मागचे निश्चित कारण व पार्श्वभूमी समजू शकली नाही. पोलिस घटनास्थळी पोहचले असून माहिती घेतली जात आहे. या प्रकरणाला अनैतिक संबंधांची किनार […]
समांतर क्रांती / बेळगाव Shocking: Poison in school water tank; Sri Ram Sena president’s monstrous conspiracy राक्षसी प्रवृत्तीच्या त्रिकुटाने शाळेतील पाण्याच्या टाकीत विष मिसळल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकसि आले आहे. श्रीराम सेना या संघटनेचा तालुकाध्यक्षच या कटाचा म्होरक्या असल्याचे निष्पन्न झाल्याने बेळगाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात खळबळ माजली आहे. दुसऱ्या धर्मातील मुख्याध्यापिकेची बदली करण्यासाठी हा कट […]
समांतर क्रांती / खानापूर रस्त्यावरचे खड्डे हा काही नवा विषय नाही. याबाबतीत अख्खा खानापूर तालुका ‘खड्ड्यात’ गेला आहे. खानापूर – जांबोटी रस्त्यावर रामगुरवाडी जवळ मधोमध भलामोठा खड्डा पडला आहे. यामुळे अपघाताना निमंत्रण मिळत असून याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाल्याबद्दल लाखोल्या वाहिल्या जात आहेत. रामगुरवाडी क्रॉसपासून जवळ एका वळणावर हा खड्डा पडला असून त्यात पाणी […]
समांतर क्रांती / खानापूर बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीची रंगीत तालिम आज चिक्कहट्टीहोळी येथे दिसून आली. काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराला विरोधकांनी पळविल्याचा प्रकार घडला असून निवडणूक भयमुक्त होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सत्तेच्या आडून दडपशाही चालविली जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्याच विधान परिषदेतील आमदारांच्या समर्थकांनी उमेदवार पळविण्याचा प्रकार घडला […]