समांतर क्रांती / बंगळूर कर्नाटकात खळबळ उडवून दिलेल्या सेक्स स्कँडलप्रकरणी माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांचे नातू आणि माजी खासदार प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ३२ महिलांचे लैंगीक शोत्रण केल्याचा आरोप त्याच्यावर होता. लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात काल शुक्रवारी (ता.०१) रोषारोप सिध्द झाला होता. त्यानंतर आज न्यायालयाने शिक्षा सुनावली. यावेळी प्रज्वल याने डोळ्यात पाणी आणून आपली […]
समांतर क्रांती / खानापूर Will Dr. Anjali Nimbalkar announce her position regarding DCC tomorrow? तालुक्यात सध्या अनेक समस्यांनी नागरीक त्रस्त असतांना कोणत्याच पक्षनेत्यांचे याकडे लक्ष नाही. सगळेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांत रमले आहेत. भाजपचे आमदार विठ्ठल हलगेकर, काँग्रेसचे विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळ्ळी आणि विद्यमान संचालक माजी आमदार अरविंद पाटील यांनी त्यांच्यापरिने मोर्चेबांधणी सुरू केली […]
समांतर क्रांती / खानापूर सीमाभागात सुरू असलेल्या कन्नडसक्ती विरोधात तसेच मराठी भाषिकांना मराठी भाषेमध्ये परिपत्रके मिळावीत, या मागणीसाठी ११ ऑगस्ट रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शिवस्मारकात आयोजित करण्यात आली आहे. […]
समांतर क्रांती / खानापूर भीमगड अभयारण्यातील लोकांच्या मरणयातना देश स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतरही संपलेल्या नाहीत. पावसाळ्यात १३ गावांना बेटाचे स्वरूप येते. तेथील लोकांचा बाहेरच्या जगाशी पूर्णपणे संपर्क तुटतो. दुर्दैवाची बाब म्हणजे कुणी आजारी झाल्यास एकतर त्या व्यक्तीला मरणाची वाट पाहत मरणयातना सहन कराव्या लागतात. नाहीतर रुग्णाला जीवंतपणीच ‘तिरडी’चा आधार घेऊन दवाखान्यात दाखल होत ‘जगण्या’साठी धडपड करावी […]
समांतर क्रांती / पर्यटन विशेष २०१३ साली चेन्नई एक्स्प्रस या हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. रोहीत शेट्टीने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात आघाडीचे नट शारूख खान आणि नटी दिपीका पदुकोन यांनी काम केले होते. २०१३ साली हाऊसफुल्ल ठरलेला हा चित्रपट आताश: कुणाला आठवतही नसले. पण, त्या चित्रपटातील एका दृष्याने मात्र गोवा राज्याच्या हद्दीतील दूधसागर धबधबा मात्र अविस्मरणीय […]
समांतर क्रांती / खानापूर आमदार विठ्ठल हलगेकर यांनी विधानसभा निवडणुकीत तालुक्यात शटल बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. तालुक्यात शटल बससेवा तर सुरू झालीच नाही; त्याउलट बसअभावी विद्यार्थ्यांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. त्यामुळे आमदार साहेब, तालुक्यात हे काय चाललंय? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून विचारला जात आहे. येथील बस आगर समस्यांचे आगर बनले आहे. […]
समांतर क्रांती / खानापूर शहरापासून जवळच असलेल्या होनकल येथून तरूण बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडीलांनी खानापूर पोलिसांत नोंदविली आहे. राजू बसाप्पा हणबरहट्टी (वय ३२) असे या तरूणाचे नाव असून तो मुळचा गोकाक तालुक्यातील अंकेतंगीनहाळ येथील रहिवासी आहे. सध्या तो होनकल येथील विठ्ठल झुंजवाडकर यांच्या शेतात राहत होता, तेथून तो ०६ जून रोजी बेपत्ता झाला असल्याचे […]
समांतर क्रांती / खानापूर A soldier from Khanapur died on the spot in a bike accident. दुचाकीच्या अपघातात खानापुरातील जवान जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. सुरज मोहन द्रौपदकर (वय २९, रा. विद्यानगर-खानापूर) असे मयताचे नाव असून तो भारतीय लष्करात सेवारत होता. घटनेची नोंद खानापूर पोलिसांत झाली आहे.सुरज हा खानापूरहून बेळगावकडे […]
समांतर क्रांती / रामनगर रामनगर येथील जवान शशिकांत गोसावी (वय ४५) यांचे पंजाब – पठाणकोट येथे निधन झाले होते. त्यांना आज गुरूवारी (ता.३१) शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी रामनगर पंचक्रोशीतील नागरीकांनी सकाळी रामनगरात अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. प्रसंगी त्यांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. जवान शशिकांत गोसावी हे गेली २४ वर्षे भारतीय सेनेत […]
समांतर क्रांती / लोंढा अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वनाधिकाऱ्याला अटक करून कारागृहात रवानगी करण्यात आल्याची घटना रामनगर येथे घडली आहे. लिंगप्पा लमाणी (वय ४५, रा. विजयपूर) असे या वनाधिकाऱ्याचे नाव आहे. Forest officer arrested for abusing minor, sexually assaulting minor. याबाबतची अधिक माहिती अशी, पिडीत मुलगा नेहमीच्या कामाच्या ठिकाणी जात असतांना कुंबेली तपासणी नाक्यावरील […]