समांतर क्रांती / गर्लगुंजी गर्लगुंजी-बेळगाव शटल बससेवा बंद करून गर्लगुंजी ते नंद्दीहळ्ळी-बेळगाव अशी बसफेरी सुरू केल्याने विद्यार्थी आणि नागरीकांची गैरसोय सुरू होती. मंगळवारी संतप्त नागरीकांनी रास्तारोको करीत बस आडविल्याने परिवहन मंडळाला जाग आली आणि तात्काळ बससेवा पूर्ववत करण्याची ग्वाही आगारप्रमुखांनी दिली. गर्लगुंजी ते बेळगाव शटल बससेवा सुरू होती. पण, खासदार जगदीश शेट्टर यांनी नंद्दिहळ्ळीच्या प्रवाशांची […]
समांतर क्रांती / लोंढा मिरज – लोंढा रेल्वेत अज्ञात चोरट्यांनी तरूणाचा खिसा कापून सुमारे १ लाख ९ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी (ता.१४) रात्री घडली. दीपक मड्डी हा बेळगावहून लोंढ्याला येत असतांना त्याच्याकडील ९३०० रुपयांची रोकड आणि रु. १ लाख किमतीचे १० ग्रॅम सोन्याचे नाणे चोरट्यांनी लांबविले आहे. दीपक हा नेहमीप्रमाणे मिरज – लोंढा […]
समांतर क्रांती /चोर्ला चोर्ला घाटात काल सोमवारी (ता.१४) मुसळधार पाऊस कोसळत असून आज मंगळवारी (ता.१५) सकाळी घाटात दरड कोसळली. त्यामुळे कांही काळ चोर्ला महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, त्याच ठिकाणी एक सिमेंटची वाहतूक करणारा ट्रक दरीत उलटला असून सुदैवाने चालक बचावला आहे. मात्र, ट्रकमधील साहित्य आणि ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत […]
समांतर क्रांती / गोकर्ण गोकर्ण येथील रामतीर्थ डोंगरावरील गुहेतआढळलेली महिला नीना कुटीना हिच्याबद्दलचे गुढ दिवसेदिवस वाढत चालले आहे. आठ वर्षे ती त्या भयावह गुहेत कशी राहिली, तीचा उदरनिर्वाह कसा चालत होता, त्यासाठीचा खर्च कसा केला जायचा, यासह तीला जर सहा आणि चार वर्षांच्या मुली असतील आणि त्यांचा जन्म त्या गुहेतच झाला असेल तर त्या मुलींचा […]
समांतर क्रांती / खानापूर खानापूरसह रामनगर पोलिस स्थानकात १६ हून अधिक गुन्हे दाखल असलेला गुंड प्रविण सुधीर (रा. रामनगर) याच्यावर सोमवारी पोलिसांनी गोळीबार केला. त्यात तो जखमी झाला आहे. तसेच यल्लापूर पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस निरीक्षक व तीन पोलिस कर्मचारी सुध्दा या घटनेत जखमी झाले आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी, रामनगर येथील गुंड प्रविण सुधीर […]
समांतर क्रांती / खानापूर शालेत चक्क मुख्याध्यापकाच्या टेबलवरच सापाने ठिय्या मांडल्याची घटना गवाळी येथील शाळेत घडली होती. त्यानंतर शहरापासून आवघ्या १२ कि.मी. अंतरावरील गावातील शाळेच्या परिसरातच अस्वलाच्या वावराने खळबळ उडाली आहे. शिक्षकांनी अस्वलाच्या भितीने ‘तुमच्या मुलांना शाळेच्या वेळेतच पाठवा. वेळेपूर्वी पाठवू नका, तुम्ही स्वत: मुलांना शाळेत सोडा,’ असा संदेश मोबाईलवर पाठविला आहे. जंगली श्वापदांनी तालुक्याच्या […]
समांतर क्रांती / बेळगाव शाळेतील पाण्याच्या टाकीत अज्ञातांनी किटकनाशक टाकल्याची घटना सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात ही घडली आहे. किटकनाशक मिश्रीत पाणी पिल्याने १२ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. आज सोमवारी (ता.१४) हुल्लीकट्टी शाळेत पाणी प्यालेल्या १२ विद्यार्थ्यांना चक्कर आणि उलट्या व्हायला सुरूवात झाल्याने तात्काळ त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. […]
बेळगाव: खानापूर पोलिस स्थानकाचे हवालदार जगदीश काद्रोळी यांचा जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. भिमाशंकर गुळेद यांनी सन्मान केला. गुन्हे शाखेत जगदीश यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना प्रशंसापत्र देऊन प्रोत्साहीत करण्यात आले.पोलिस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात डॉ. गुळेद यांनी चांगली कामगिरी केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
समांतर क्रांती / कणकुंबीचोर्ला घाट जैववैविधतेने परिपूर्ण असून तेथे अनेक प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती आणि पशू-पक्षी आढळतात. नुकताच या भागात स्कर्ट मशरुम (व्हील्ड लेडी) आणि मलबार ट्री-टोड बेडकाची प्रजाती आढळली आहे. भीमगड आणि म्हादई अभयारण्याच्या अखत्यारितील या जंगलातून मोठ्या प्रमाणात दुर्मिळ वनस्पती आणि प्राण्यांची तस्करी होते. सध्या जंपिंग चिकनसाठी बेडकांची तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त केला […]
समांतर क्रांती / खानापूर मेरडा येथील गणेश मूर्तिकार तुकाराम सुतार यांचे राहते घर काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात कोसळले. त्यात त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. त्याच बरोबर त्यांनी बनवलेल्या शाडूच्या गणेशमूर्ती सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज सोमवारी (ता.१४) श्री विश्वकर्मा समाज विकास देवस्थान ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी घराची पाहणी करून सांत्वन केले. […]