समांतर क्रांती / कणकुंबी खानापूर तालुक्यातील कणकुंबी आणि चिगुळे माऊली मंदिरे प्रसिध्द आहेत. नेहमीच या मंदिरात माऊली देवीच्या दर्शनासाठी कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातील भाविकांची गर्दी असते. सध्या वर्षा पर्यटनामुळे पर्यटकांची ओढा या परिसरातकडे वाढला आहे. त्यातच शुक्रवारी (ता.११) चिगुळे येथील माऊली मंदिरात दान पेट्या फोडून चोरी करण्यात आल्याच्या घटनेमुळे खळबळ माजली आहे. संतापजनक बाब म्हणजे […]
समांतर क्रांती / विशेष नुकताच महाराष्ट्रातील १२ गडकोट आणि किल्ल्यांचा युनोस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करून छ. शिवरायांना मानाचा मुजरा केला आहे. रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, लोहगड, साल्हेर खांदेरी आणि जिंजीच्या किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थलांत समावेश झाल्याने महाराष्ट्राच्या म्हणजेच तमाम स्वराज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. जागितिक वारसा स्थळात […]
समांतर क्रांती वृत्त / खानापूर कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलाला जबर मारहाण करण्यात आल्याचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर तब्बल २० दिवसांनी पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. सदर घटना रामनगर (ता. जोयडा) येथे घडली असून पोलिस काय कारवाई करणार? याकडे पालकांसह नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. रामनगर येथील एका अल्पवयीन मुलाला कोयत्याचा धाक दाखवून मारहाण […]
समांतर क्रांती / गोकर्ण गोकर्ण येथील रामतिर्थ डोंगरातील एका गुहेत रशियन ४० वर्षीय महिला आणि तिच्या दोन मुली आढळल्या आहेत. दरम्यान, घनदाट जंगलातील या गुहेत त्या कशा जिवंत राहिल्या? त्या काय खाऊन जगत होत्या? कशा राहत होत्या? ती महिला गुहेत राहून नक्की काय करीत होती? असे अनेक प्रश्नांनी सर्वसामान्यांना हैराण करून सोडले आहे. शुक्रवारी […]
समांतर क्रांती / खानापूर चोर्ला घाट हा सह्याद्रीच्या कुशीत विसावला आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्याच्या हद्दीतील या जैववैविध्यतेसाठी परिपूर्ण परिसरात अनेक दुर्मिळ पशू-पक्षी आणि वनस्पती आढळतात. नुकताच सुर्ला (सुरल) येथील नामदेव गावकर यांना स्कर्ट मशरूम (फॉलस इंडस्टाम) ही दुर्मिळ प्रजातीची आळंबी आढळली असून तिचे छायाचित्र त्यांनी घेतले. #wild life at chorla ghat चोर्ला घाटातील जैववैधतेचे […]
रविवार विशेष / चेतन लक्केबैलकर बेळगाव आणि संपूर्ण सीमाभागावर कर्नाटक सरकारकडून केली जाणारी कन्नडसक्ती ही आजकालची नसून तिला ५२ वर्षांचा काळा इतिहास आहे. २२ जुलै १९७३ पासून कन्नडसक्तीला सुरूवात झाली. १९८६ च्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात नऊ जणांनी हौतात्म्य पत्करले. शेकडो मराठी भाषिक जायबंदी झाले, तर हजारो सत्याग्रहींनी संसारावर तुळशीपात्र ठेवून तुरूगवास भोगला. तरीही मराठी माणसाने […]
समांतर क्रांती वृत्त / खानापूर येथील उद्योजक दयालाल पटेल (वय ६५) हे मंगळवारपासून (ता.८) बेपत्ता आहेत. त्यांचे चप्पल मलप्रभा नदीच्या घाटावर आढळून आल्याने संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध चालविला असला तरी ते कोठेच आढळून आलेले नाहीत. त्यामुळे नदी पात्रातही त्यांचा शोध घेण्यात आला. पण, त्यातही यश आलेले नाही. सदर व्यक्त कुणाला […]
समांतर क्रांती वृत्त गोव्याला जाण्याचा पर्यटकांचा उत्साह गोव्यात प्रवास करताच मावळतो. कारण, गोव्यातील वाहनांची तपासणी ही बाहेरच्या राज्यातून गोव्यात जाणाऱ्या पर्यटक, प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी असते. पण, आता त्यावर गोवा राज्य सरकारने तोडगा काढला असून गोव्यातील अंतर्गत प्रवास सूकर होणार आहे. परतु, चालकाकडे आवश्यक कागदपत्रे नसतील तर मात्र सावधान.. राज्यात प्रवास करणाऱ्या इतर राज्यातील वाहनांची अनेक […]
समांतर क्रांती वृत्त / बेळगाव एकाच कुटुंबातील तिघांच्या आत्महत्येने खळबळ उडवून दिलेल्या प्रकरणात गुरूवारी (ता.१०) तिघांना अटक करण्यात आली आहे. राजेश कुरतडकर, भास्कर सोनारकर आणि नानासो शिंदे अशी संशयीतांची नावे असून त्यांच्याकडून ६०० ग्रॅम सोन्यासह चार लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. काल बुधवारी (ता.९) खासबाग – जोशी मळ्यातील संतोष कुर्डेकर याच्यासह त्याची आई आणि […]
समांतर क्रांती वृत्त / खानापूर परिश्वाड रस्त्यावर शहराजवळ पडलेले खड्डे भरून कांहीनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा उलट परिणाम झाला. आधीच खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या प्रवाशांची आवस्था गीतून फुफाट्यात अशी झाली होती. आज गुरूवारी (ता. १०) समांतर क्रांतीने यावर प्रकाश टाकल्यानंतर लागलीच सार्वजनिक बांधकाम खात्याने खडी टाकून रस्ता चिखलमुक्त केला. दरम्यान, आता यावरून भाजपमध्येच एकमेकांवर […]