समांतर क्रांती / खानापूर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी स्पर्धेला सामोरे जाणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राथमिक अवस्थेत स्पर्धा परीक्षांची तोंड ओळख झाल्यास भविष्यात त्यांना करिअरची वाट निवडणे सोपे ठरते. स्पर्धा परीक्षा, करिअर घडवण्याचे सर्वात उत्तम माध्यम आहे. त्या दृष्टीने पालकांनी अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षांसाठी पोषक वातावरण निर्माण करावे. मनाजोगे करिअर निवडून समाज व राष्ट्रसेवेचा राजमार्ग […]
समांतर क्रांती / डेस्क केरळमध्ये मान्सूनचा प्रवेश, मान्सून गोव्यात पोहचला, मान्सूनची कर्नाटक-महाराष्ट्रात सलामी अशा बातम्या आपण नेहमीच वाचतो. मान्सूनचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये सहसा १ जूनला मान्सून दाखल होतो. त्यानंतर इतर राज्यात मान्सून दाखल होण्याच्याही तारखा ठरलेल्या आहेत. देशभरात मान्सून दाखल व्हायला किती दिवस लागत असतील? असा प्रश्न नेहमीच पडलेला असतो. आयएमडी अर्थात इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या […]
समांतर क्रांती / खानापूर गर्लगुंजीसह इदलहोंड, निट्टूर, बरगाव ग्राम पंचायत हद्दीतील शेकडो गावातील नागरिक, विद्यार्थ्यांना त्यांच्या शासकीय कामकाजासाठी जांबोटीला जावे लागते. त्यासाठी सुमारे २५ कि.मी.चा प्रवास करावा लागतो. त्यातही सदर काम एका फेरीत झाले नाही तर संबंधीतांची परवड होते. करिता, गर्लगुंजी येथे नेम्मदी केंद्र सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी महसूल मंत्री कृष्णा भैरेगौडा यांच्याकडे […]
खानापूर: तिओली (सध्या राहणार हिंदू नगर-खानापूर) येथील रहिवाशी व विमा प्रतिनिधी पांडुरंग शांताराम हेब्बाळकर (वय ५५) यांचे आज (ता. ०४) सकाळी ११ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. आज सायंकाळी पाच वाजता तिओली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, चिरंजीव, कन्या, भाऊ व वहिनी असा परिवार आहे. ते भाजपचे युवानेते व सामाजिक कार्यकर्ते किशोर […]
समांतर क्रांती / बेळगाव भाजपचे खासदार इराण्णा कडाडी यांनी सीमाप्रश्नावर बेताल वक्तव्य करीत अकलेचे तारे तोडले आहेत. त्यांनी सीमाप्रश्न हा संपलेला विषय आहे, अससे म्हणत नव्या वादाला तोंड फोडले असून त्यांचा मराठी भाषिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी चांगलाच समाचार घेत ‘जोपर्यंत मराठी माणूस सीमाभागात […]
समांतर क्रांती / खानापूर मणतुर्गा (ता.खानापूर) येथील शाळा सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी ईश्वर मंगेश बोबाटे तर उपाध्यक्षपदी नारायण अनंत पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. नुकताच पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नव्या शाळा सुधारणा समितीची निवड करण्यात आली. शाळा सुधारणा समितीत अध्यक्ष इश्वर बोबाटे, उपाध्यक्ष नारायण पाटील यांच्यासह मावळते अध्यक्ष प्रल्हाद दशरथ मादार, सुधीर रघूनाथ पाटील, गणपती […]
समांतर क्रांती / खानापूर धबधबे फेसाळू लागल्याने शनिवार, रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशी जांबोटी-कणकुंबी भागात वर्षा पर्यटनाला सुगीचे दिवस आले आहेत. पर्यटकांच्या हुल्लडबाजीमुळे स्थानिक त्रस्त झाले असतांनाच धूम स्टाईल दुचाक्या हकणाऱ्या तरूणांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. रविवारी (ता.२९) चोर्ला महामार्गावर हब्बनहट्टी फाट्यानजिक दुचाकीस्वाराने कँटरला समोरासमोर धडडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला तर अन्य एकजण गंभीर […]
समांतर क्रांती / खानापूर मध्यवर्ती म.ए.समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मऱ्याप्पा पाटील यांचा मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या बैठकीत सत्कार करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर होते. प्रारंभी सचिव वासूदेव चौगुले यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. प्रतिष्ठानच्या प्रबोधनकार ठाकरे वाचनालयातर्फे विविध उपक्रम हाती घेऊन ते सक्षमपणे राबविण्याचा निर्णय यावेळी बैठकीत घेण्यात आला. यावेळी बोलतांना अध्यक्ष नारायण […]
समांतर क्रांती / गुन्हेवृत्त गवंडी काम करतानाच चोऱ्यांचा नाद जडलेल्या तरूणांने अनेक ठिकाणी घरफोड्या करून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पोलिसांची तारांबळ उडविली होती. पण, पोलिसांनी अखेर त्याला बेड्या ठोकल्या. हलशी येथील महादेव धामणेकर या अंतरराज्य चोरट्याला अटक करून त्याकडून सुमारे २० लाखांचे दागिणे जप्त करण्यात कित्तूर पोलिसांना यश आले आहे. संशयीत महादेव धामणेकर हा कोल्हापूरमध्ये गवंडीकाम […]