समांतर क्रांती / खानापूर सोमवारी (ता.३०) तालुक्यातील रस्ते, वीज आणि सरकारी रुग्णालयावर मराठीतून फलक लावण्याच्या मागणीचे निवेदन संबंधीत अधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय आज शुक्रवारी (ता.२७) झालेल्या म.ए.समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी सीमाप्रश्नाच्या लढ्याला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचेही यावेळी ठरविण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोपाळ देसाई होते. प्रास्ताविक आणि स्वागत सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले. कार्याध्यक्ष […]
समांतर क्रांती / मान्सून स्पेशल समुद्र सपाटीपासून 649 मीटर म्हणजेच 2129 फुट उंचीवर असलेल्या खानापूर तालुक्यात मलप्रभा (कणकुंबी), म्हादई (देगाव), मार्कंडेय (बैलूर) , काळी नदी (डोंगरगाव), मंगोत्री (मोदेकोप), पांढरी नदी (कामतगा) या नद्यांचा उगम होतो. त्याशिवाय कळसा, भांडुरा, हलतर, बैलओहोळ, निट्टूर नाला, कुंभार ओहोळ, हालात्री, सुर्ल नाला यासह सुमारे डझनभर नाल्यांचा उगम तालुक्याच्या पश्चिम भागातून […]
समांतर क्रांती / विशेष मान्सूनपूर्व आवकाळी पावसाने तालुकावासीयांच्या तोंडचे पाणी पळविले. मध्यंतरी, चार दिवस पावसाने उसंत दिल्यानंतर मशागतीला वेग येईपर्यंत मान्सून थडकला. परिणामी, खानापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास दुबार पेरणीचे संकट टांगत्या तलवारीसारखे मानगुटीवर आहे. रस्त्यांची चाळण झाल्याने प्रवाशी त्रस्त आहेत. शासकीय कार्यालयातील बोकाळलेल्या भ्रष्टाचारांने सर्वसामान्यांची दैना केली आहे. अशातच आता […]
समांतर क्रांती / खानापूर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कारण, खात्यावर रक्कम असतांनादेखील संबंधीतांनी डिमांड ड्राफ्ट देण्यास नकार दिल्याने पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या प्रकरणात तालुका काँग्रेसच्या नेत्यांनी उडी घेतली असून नागरिक आणि कृषी पत्तीन संस्थांनी त्यांच्या ठेवी सुरक्षित असल्याबद्दल खात्री करून घ्यावी, असे आवाहन केले […]
मणतुर्गे तालुका खानापूर येथे गुढीपाडवा निमित्त श्री रवळनाथ मंदिराच्या चौकटीचे आगमन सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी सकाळी ठीक १० वाजता श्री सातेरी माउली मंदिर येथे झाले. नुतन चौकटीचे औक्षण गावांतील वतनदार सौ. व श्री. नागेश विठ्ठल पाटील, सौ. व श्री. ज्योतिबा दत्तू गुरव, सौ. व श्री. आबासाहेब नारायणराव दळवी अध्यक्ष श्री रवळनाथ मंदिर जिर्णोद्धार […]
खानापूर तालुक्यातील राशन घोटाळा लवकरच काही तासांत उघड करणार : सुर्यकांत कुलकर्णी ( पंचहमी योजना अध्यक्ष ) यांनी असा इशारा दिला आहे. गोर गरीब जनतेचा तांदूळ कोण गायब करतयं ? कसा गायबं करतात ? कोण कोण सामील आहे ?सगळ्या भानगडी बाहेर काढणार, असे ते म्हणाले. गेले अनेक वर्ष दरमहा लाखो रुपयांचा राशन मधे भ्रष्टाचार चालू […]
खानापूर तालुक़ा ब्लॉक अध्यक्ष अॅड ईश्वर घाडी व माजी झेडपी पांडुरंग देसाई यांनी अस्वल हल्ल्यात जखमी झालेल्या विलास चिखलकर यांच्या कुटुंबियांची केएलई हॉस्पीटल बेळगाव येथे जाऊन भेट घेतली. कालच माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी एसीएफ खानापूर यांचेशी संपर्क करून ताबडतोब सरकारी मदत करण्यासंदर्भात सांगितले आहे. कालच चिखलकर यांच्या मुलाकडून आम्ही […]
सातनाळी मराठी शाळेचा सुवर्ण महोत्सव उत्साहात पायाभूत सुविधांपासून वंचित असूनही सातनाळी सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात मिळवलेले यश केवळ कौतुकास्पद नाही तर अभिमानास्पद आहे. येथील अनेक पिढ्यांना घडविण्याच्या कार्यात या गावच्या सरकारी मराठी शाळेने दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. संकटांना संधी मानून परिस्थितीशी केलेला संघर्ष मानवाला यशस्वी बनवितो. त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून सातनाळी गावाकडे पहावे […]
समांतर क्रांती / खानापूर अनेक कारणांनी चर्चेत असलेल्या हलगा गावात आज झालेल्या बैठकीत श्री महालक्ष्मी कृपेने गाव एकवटले. या बैठकीत महालक्ष्मी मंदिराच्या जिर्णोध्दाराचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे गावात एकीची वज्रमूठ आवळली जाईल, असा विश्वास येथील पुढाऱ्यांनी व्यक्त केला आहे. श्री महालक्ष्मी मंदिर येथे हलगा ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. हलगा ग्राम पंचायत […]
गावगोंधळ / सदा टीकेकर जंगली जनावरांचे हल्ले वाढले की, आपण लगेच गळे काढू लागतो. पण, जेव्हा आपण त्यांची शिकार करतो. त्यांच्या अधिवासात अतिक्रमन करतो, तेव्हा ते बिचारे मुके जीव कुणाकडे त्यांचे गाऱ्हाणे मांडत असतील? कुत्र्यांनी हल्ले केली की लगेच कुत्र्यांना ‘कुत्ते की मौत’ देण्यासाठी सगळेच कसे ताणून उभे राहिलेत! कुत्र्यांची चुक आहेच म्हणा! त्यातही ती […]