नंदगड: हत्तरवाड (ता.खानापूर) येथील रहिवासी भीमराव अमृत पाटील (वय ८७) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुलगे, चार विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवार दि.२४ रोजी होणार आहे
समांतर क्रांती / खानापूर गेल्या दोन महिन्यापासून खानापूर-अनमोड मार्ग बंद करण्यात आला आहे. आजपासून (ता.२२ मार्च) हा रस्ता वाहतुकीस खुला केला जाणार होता, पण कंत्राटदाराच्या वेळकाढूपणामुळे पुढील महिनाभर तरी हा रस्ता वाहतुकीस बंदच राहणार असल्याचा अंदाज आहे. खासदारांच्या दुर्लक्षामुळेच कामास दिरंगाई होत असल्याचा आरोप यादरम्यान काँग्रेसचे या भागातील नेते ईश्वर बोबाटे यांनी केला आहे. रेल्वे […]
समांतर क्रांती / खानापूर तालुक्यात गेल्या दोन-चार दिवसांत कुत्र्यांच्या हल्ल्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. आज तर बिडीत एका बालिकेवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून कानाचा चावा घेतल्याच्या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे. दोन दिवसांपूर्वीच निट्टूर येथे सुध्दा एका कॉलेज तरूणीवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. अशा घटनांनी सध्या तालुक्यात घबराट पसरली आहे. आज बिडी […]
समांतर क्रांती / खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांना पक्के रस्ते, पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन तसेच वीज वाहिन्यांच्या कामांसाठी वनविभागाने आडकाठी न आणता विकास कामांना सहकार्य करावे, अशी मागणी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड ईश्वर घाडी व भूलवाद कमिटीचे सदस्य विनायक मुतगेकर यांनी वनमंत्री ईश्वर खांडरे यांच्याकडे केली आहे. गुरूवारी (ता.२०) बेंगळूर विधानसौध येथे ॲड. घाडी यांनी […]
समांतर क्रांती / खानापूर आजपासून दहावीच्या परिक्षेला सुरूवात होत आहे. यावेळी तालुक्याचा निकाल ८५ टक्के लावण्याचे उद्दीष्ट खात्याने ठेवले आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना मुलभूत सुविधांसह कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती क्षेत्र शिक्षणाधिकारी पी. रामप्पा यांनी ‘समांतर क्रांती’ला दिली. असे असेल नियोजन: परिक्षा केंद्र : ११ खानापूर शहरात मराठा मंडळ, ताराराणी हायस्कूल आणि सर्वोदय हायस्कूल ग्रामीण […]
समांतर क्रांती / विशेष अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचीवपदावर कार्य करणे साधेसुधे नाहीच. कारण, त्यासाठी अनेक राज्यांच्या समित्यांशी संबंध येतो, वेगवेगळ्या लोकांशी, विविध जाती – धर्माच्या लोकांशी, सर्वसामान्यांशी संबंध येतो. त्यासाठी प्रत्येक प्रदेशातील रुढी-परंपरा, तेथील संस्कृती समजून घेणे, प्रत्येक समाजात मिसळणे आगत्याचे ठरते. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून येथील माजी आमदार आणि अखिल भारतीय कमिटीच्या सचीव तसेच […]
समांतर क्रांती / नंदगड हलगा पंचायतीच्या अध्यक्षपदी सुनील मारुती पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोण अध्यक्ष होणार याबाबत सुरू असलेल्या चर्चेला विराम मिळाला आहे. अध्यक्षपदाची निवड जाहीर होताच फटाक्याची आतिषबाजी करून गुलाल उधळून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्यावर अविश्वास ठराव दाखल खानापूर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून […]
समांतर क्रांती / विशेष रिपोर्ट कौलापूर वाडा हे गाव नक्कीच खानापूर तालुक्यात किंवा लोकशाहीवादी भारत देशात आहे का? असा प्रश्न पडावा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. गवळ्यांच्यावाड्यात सर्रास दिसतात ते गुरांचे गोठे. त्यामुळे माशांचा, डासांचा प्रादूर्भाव वाढून रोगराईने माणस मरूनच जातील, अशी स्थिती दिसत असली तरी प्रत्येक गवळीवाड्यावरील स्वच्छता अशी असते ही गोठ्यातही एकाद्याचे मन […]
बेळगाव: रंगपंचमीने रंगाने बेरंग केल्याच्या घटना काल जिल्ह्यातील दोन ठिकाणी घडल्या. यात घटनांत तीन चिमुकल्या शाळकरी मुलांना जीव गमवावा लागल्याने नको ती रंगपंचमी असे म्हणण्याची वेळ पालकांवर आली आहे. चिकोडीजवळील एकसंबा येथे रंगपंचमीनंतर विहिरीत पोहण्यास गेलेल्या वेदांत हिरकोडी (११) व मनोज कल्याणी (९) या दोघा मित्रांचा बुडून मृत्यू झाला. तर चिकोडी जवळीलच बारवाड येथे रंग […]
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर कोकणाची सोनेरी किनार लाभलेला खानापूर तालुक्याचा पश्चिम घाट, त्यातच सह्याद्रीच्या कुशीत वसलेली खुराड्यासारखी गावं.. शिव छत्रपती आणि छत्रपती संभूराजेंच्या पदस्पर्शाने पावन झालेला ‘भीमगड’ आणि या किल्ल्याचा परिसर आज चर्चेत आहे. शापीत बनत चालेललं हे जंगल ‘माणसांनाच खायला उठलंय की काय?’ दोन दिवसांपूर्वी गवाळीच्या तरूणाने नेरसेजवळ जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली. […]