मणतुर्गे येथे श्री पांडुरंग नाम सप्ताहाला सुरुवात खानापूर : मणतुर्गे (ता.खानापूर) येथील श्री पांडुरंग अखंड नाम सप्ताहाची बुधवार दि. ५ रोजी रात्रौ ८ वाजता जय जय राम कृष्ण हरी या नाम मंत्राने सुरुवात झाली. पुढील पाच दिवस हा सप्ताह होणार असून या काळात हरिनामाच्या गजरात परिसर न्हाऊन निघणार आहे. तरी भाविकांनी या पर्वणीचा लाभ घेण्याचे […]
खानापूर: बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील गोव्यात वास्तव्यास असलेल्या बांधवांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर खानापूर-बळगावकर प्रिमियर लीग शनिवार (ता.०८) आणि रविवारी (ता.०९) कॉम्पेक्स् ग्राऊंड फोंडा येथे होणार आहे. स्पर्धेसाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी प्रथम पारितोषिक रू. २५ हजार आणि उपविजेत्या संघासह १५ हजारांचे पारितोषिक भास्कर काकोडकर यांनी पुरस्कृत करण्यात आले आहे. अशोक सावंत […]
समांतर क्रांती / खानापूर येथील खानापूर को-ऑप बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी शनिवारी (ता. ०८) १०.३० वाजता होणार आहे. निवडणूक अधिकारी व जिल्हा सहकार निबंधक रविंद्र पाटील यांनी याबाबत आज सूचना जारी केली आहे. सदर मतमोजणी बँकेच्या सभागृहात होणार आहे. मतमोजणीत कुणाचा निकाल लागणार याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. अचानक झालेल्या मतदारांच्या नोंदीमुळे मतदानानंतरही मतमोजणी कायद्याच्या […]
चार दशकांपासून वनसेवेत कार्यरत, जनसेवेतही रममाण वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळी मानवी जीवनात वृक्ष आणि निसर्गाचे स्थान-मान दर्शवितात. मानवाच्या अमर्याद गरजांसाठी निसर्गाच्या अस्तित्वावर घाला घालण्याची मानसिकता वाढलेली असताना एक अधिकारी वनसेवेलाच ईश्वरसेवा मानतो. जाईल तेथे लोकांमध्ये निसर्गा विषयी आपुलकी निर्माण करतो. अधिकारी पदाचे मोठेपण बाजूला ठेवून जंगल […]
समांतर क्रांती / खानापूर येथील खानापूर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या रखडलेल्या मतमोजणीचा मार्ग मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात झालेल्या आजच्या (ता.३०) सुनावणीत मतमोजणीला हिरवा कंदील मिळाला आहे. सहकार खात्याच्या निबंधकांकडून मतमोजणीची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. बँकेची निवडणूक १२ जानेवारी रोजी मोठ्या चुरशीने झाली होती. मात्र, दोन्ही पॅनेलनी अचानक उच्च न्यायालयात धाव घेऊन मतदार […]
कांहीच्या आयुष्यात संकटांनी गारूड केलेले असते. ती संकटे त्यांच्या जगण्याच्या आकांक्षेशी इर्शाच करीत असतात जणू. त्यातूनही ही माणसं वाट काढतात, संकटांशी दोन हात करतात. पळवाट मात्र काढत नाहीत. यशाच्या शिखरापर्यंत पोहचतात. पण, त्यांचे पाय मात्र मातीत घट्ट रोवलेले असतात. कारण त्यांची नाळच मुळात मातीशी जोडलेली असते. आपल्या समाजाशी ते खऱ्या अर्थाने एकरूप झालेले असतात. त्यामुळेच […]
खानापूर: हिंदू धर्मियात जागृती निर्माण करण्यासाठी रविवारी (ता.०२) रोजी येथील मलप्रभा मैदानावर हिंदू धर्मसभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारतीय सेवा मंचचे प्रमुख पंडीत ओगले यांनी आज मंगळवारी (ता. २८) पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, धर्मांतर, धर्म परिवर्तन, बांगलादेशात हिंदू धर्मीयावर होत असलेले अत्याचार, वफ्फ बोर्डाचा अतिरेक आणि हिंदू बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी सदर धर्मसभेचे आयोजन करण्यात […]
समांतर क्रांती / खानापूर खानापूर तालुक्याच्या बहुतेक सर्वच रस्त्यांवर गतीरोधक आहेत. पण, हे गतीरोधक अवैधानिक असल्याने ते जिवघेणे बनले आहेत. अशाच एका गतीरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून पडून जखमी झालेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सावित्री प्रभाकर पाटील (कडबगट्टी, ता. आळणावर) असे या महिलेचे नाव असून १९ जानेवारी रोजी नातेवाईकाच्या अत्यंविधी आटोपून पतीसमवेत […]
पुणे: पुणेस्थित बेळगाव ग्रामिण आणि खानापूर तालुक्यातील क्रिकेटप्रेमींसाठी आज मंगळवारपासून (ता.२८) ‘खानापूर प्रिमियर लिग’ क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आली आहे. धायरी पुणे येथे होत असलेल्या या स्पर्धेसाठी ३१ हजार, २६ हजार, २१ हजार आणि १५ हजार अशी पारितोषीके आहेत. संतोष वीर, मारूती वाणी, नारायण गावडे, आकाश पासलकर यांनी या स्पर्धेसाठी पारितोषीके पुरस्कृत केली आहेत. आज […]
खानापूर: असोगा येथील रहिवासी शुभांगी संभाजी पाटील (वय ४६) यांचे आज सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा आणि अविवाहीत मुलगी असा परिवार आहे. अंत्यंविधी मंगळवारी (ता. २८) सकाळी ११ वाजता असोगा येथे होणार आहे. ‘समांतर क्रांती’ परिवारातर्फे मृतात्म्यास भावपूर्ण श्रध्दांजली..!