रायचूर: सिद्धरामय्या हे सध्या मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच येत नाही. मला अजून वाट पाहावी लागेल, मी 2028 साठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार असल्याचे सांगितले मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.रायचूर येथे पत्रकारांशी बोलताना, कोणतीही गुप्त बैठक झाली नाही. सर्वांनी मिळून जाहीरपणे बैठक घेतली, गुप्त बैठकीचा प्रश्नच येत नाही. ती फक्त दुपारच्या जेवणाची बैठक होती. बैठकीत मुख्यमंत्री बदलाबाबत […]
समांतर क्रांती / खानापूर देवलत्ती (ता. खानापूर ) येथील महेश नारायण सिमनगौडर (वय 35) याचे अपहरण करून खूणाचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी फरार असलेल्या चार संशयित आरोपीच्या मुसक्या अवळण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात संदीप लक्ष्मण चलवादी (27, रा. कग्गणगी), राघवेंद्र प्रकाश चलवादी (32, लक्केबैल), मारुती तानाजी कांबळे (28, देवराई) आणि राजशेखर […]
येळ्ळूरात २० वे मराठी साहित्य संमेलन उत्साहात येळ्ळूर: मातृभाषेला पर्याय नाही. त्यासाठी ती टिकविण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. भाषेच्या प्रश्नासाठी लढत असतांना केवळ भावनेला महत्व देऊन चालणार नाही. मातृभाषा जगविण्याबरोबरच कृतीतून तिचे संवर्धन झाले पाहिजे. सीमाप्रश्नाला एका विशिष्ठ साच्यात बांधून न ठेवता, या प्रश्नाला वैश्विक विचारांची जोड द्यायला ही, असे प्रतिपादन डॉ. शरद बाविस्कर यांनी केले. […]
समांतर क्रांती / नंदगड Suspicious death of leopard in Hirenagroli. तालुक्यातील हिरेअंग्रोळीनजिक बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचे कलेवर गावाजवळील शिवारात आढळले असून त्याची शिकार तर झाली नाही ना? याबाबत वनखात्याकडून तपास केला जात आहे. प्रथमदर्शनी वार्धक्य किंवा आजाराने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. काल रविवारी […]
समांतर क्रांती / खानापूर भाजपचे खानापूर तालुका माजी अध्यक्ष संजय कुबल यांचे वडील जयवंत कुबल यांचे आज रविवारी (ता.५) वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, मुलगी, नातवंड-पणतवंडे असा परिवार आहे. एक मितभाषी बेकरी व्यवसायीक म्हूणन जयंवत कुबल हे खानापूर शहरात परिचीत होते. येथील मोक्षधामात त्यांच्यावर रात्री ८.३० वाजता अंत्यसंस्कार होणार […]
समांतर क्रांती / खानापूर येथील मासळी बाजारात आज रविवारी (ता. ५) सकाळी ६२ किलो वजनाचा छत्री मासा (स्वॉर्डफिश) दाखल झाला. हा मासा विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. मासळी विक्रेते रोहित पोळ यांच्या दुकानात हा मासा आल्याचे समजताच त्याला बघण्यासाठी खवय्यांनी सकाळपासून एकच गर्दी केली आहे. गोव्यातील वास्को समुद्रात काल शनिवारी हा मासा आढळून आला. आज पहाटे […]
समांतर क्रांती / येळ्ळूर येथे उद्या रविवारी (ता. 5) रोजी 20 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन परमेश्वर नगर येळ्ळूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. संमेलनाध्यक्षपदी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विश्व विद्यालयातील साहित्यिक व लेखक डॉ. शरद बाविस्कर हे असणार आहेत. या संमेलनाला सिने अभिनेत्री वंदना गुप्ते ही उपस्थित राहणार आहेत. संमेलन पाच […]
रामनगर / समांतर क्रांती बेळगाव – गोवा राष्ट्रीय महामार्गांवर जोयडा तालुक्यातील अनमोड येथे मिनी टेम्पो आणि ट्रक यांच्यात धडक बसून आज संध्याकाळी भीषण अपघात घडला. या अपघातात टेम्पो चालक जागीच ठार झाला असून ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. मिनी टेम्पो हा हुबळी येथून प्लायवूड भरून गोव्यात जात होता, तर ट्रक हा गोव्यातून कर्नाटकात येत […]
समांतर क्रांती / विशेष रिपोर्ट खानापुरात सध्या कांहीच अलबेल नाही. येथील शासकीय रुग्णालयाने कात टाकली असली तरी व्यवस्थेत कोणताच बदल झालेला नाही. उपचारापेक्षा इलाज भयंकर अशी येथील स्थिती आहे. लोकप्रतिनिधी तर ‘चमकोगिरी’त गुंतले आहेत. समाजसेवेची झुल पांघरलेले ‘दलाल’ सुध्दा याकडे दुर्लक्ष करीत आहेत. भ्रष्ट अधिकाऱ्याच्या समर्थणात उर बडवून घेणारेदेखील सर्वकांही अलबेल असल्याचा आव आणत नेतेगिरी […]
समांतर क्रांती / जांबोटी दुरुस्तीच्या तातडीच्या कामासाठी उद्या रविवारी (ता. 5) जांबोटी भागात वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे. उचवडे, बैलूर, मोरब, जांबोटी, चिखले, पारवाड, कुसमळी, चिगूळे या गावात सकाळी 10 ते सायंकाळी 6पर्यंत वीज खंडित केली जाणार आहे.