बंगळूर: महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अश्लिल वक्तव्य केल्याप्रकरणी अटकेत असलेले भाजप आमदार सी. टी. रवी आणखी एका संकाटात सापडले आहेत. या प्रकरणात आता राज्य महिला आयोगाने एन्ट्री मारली असून आज नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे. याबाबत ‘न्यूज १८ कन्नड’ला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी यांनी माहिती दिली. एक मंत्री म्हणून नाही […]
समांतर क्रांती / खानापूर महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अश्लिल टिप्पणी केल्याबद्दल भाजपचे आमदार सी.टी.रवी यांना अटक करण्यात आली आहे. गुरूवारी (ता.१९) रात्री त्यांना खानापूर पोलिस स्थानकात आणले होते. त्यानंतर त्यांचे काय झाले? खानापुरातून त्यांना कुठे हलविण्यात आले? विधन परिषदेत घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गृहमंत्री अमित शहांनी अपमान केल्याबद्दल चर्चा […]
महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अश्लिल वक्तव्य केल्याप्रकरणी माजी मंत्री व भाजपचे आमदार सी.टी. रवी यांना हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. रात्री आठ वाजता त्यांना खानापूर पोलिस स्थानकात आणले आहे. BJP MLC C.T. Raveena arrested; ‘Hydrama’ at Khanapur police station. Unparlimantory statement about Minister Laxmi Hebbalkar. सुवर्णसौधमध्ये विधान परिषदेत चर्चा सुरू असतांना […]
समांतर क्रांती / अनमोड गोव्यातून दारूची तस्करी करणाऱ्या कँटर चालकास अनमोड येथील अबकारी अधिकाऱ्यांनी अटक केली. त्याच्याकडून सुमारे अडीच लाख रुपये किमतीची ७४ लिटर गोवा बनावटीच्या दारूसह एकुण १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील मुकेश सिंग वास या चालकाला अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो दारूची तस्करी करीत होता. आज […]
खानापूर: उद्या शुक्रवारी (ता.२०) सका़ळी १०.३० वाजता खानापूर ब्लॉक कॉंग्रेसची महत्वाची बैठक शिवस्मारक येथे आयोजीत करण्यात आली आहे. बैठकीला तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी आणि महांतेश राऊत यांनी केले आहे.
समांतर क्रांती / खानापूर मराठा मंडळ संचलीत ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. येथील विद्यार्थिनींनी अनेक आव्हानात्मक संकटाचा सामना करीत, आपल्या ज्ञानाचे व शारिरीक क्षमतेचा कस लावत भारतीय सैन्यात मानाचे स्थान मिळविले आहे. हे यश संपादन करण्यासाठी कठोर मेहनत व सराव यांची सांगड घालत कुमारी स्वाती पाटील, कुमारी पूनम […]
समांतर क्रांती / खानापूर येथील मिनिविधानसौध म्हणजे तहसिल कार्यालय आवार हा समस्यांचे आगार आणि वाहनतळ बनले आहे. विशेष म्हणजे येथे वाहने लावू नयेत, असा फलक असलेल्या ठिकाणीच कर्मचारी आणि अधिकारी त्यांची वाहने थांबवितात. यावरून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ‘सामाजिक’ अशिक्षितपणाच उघडा पडत आहे. मिनीविधानसौधच्या प्रवेशद्वारावर उजव्या बाजुला ‘नो पार्किंग’ या इंग्रजी फलकासह अन्य एक फलक लावण्यात […]
समांतर क्रांती / खानापूर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज खानापूर काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला. शिवस्मारक चौकात जोरदार निदर्शने करून तहशिलदारांना निवेदन सादर करण्यात आले. ना. शहांना तात्काळ मंत्रीपदावरून पायउतार करा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. गृहमंत्री शहांनी डॉ. बाबासाहेबांचे नाव घेणे ही फॅशन बनल्याचे वक्तव्य […]
समांतर क्रांती / ब्यूरो रिपोर्ट आरबीआयने जाड असलेल्या ५ रुपयांच्या जुन्या नाण्यांवर बंदी घातल्याची बातमी सध्या पसरत आहे. ही नाणी चलनातून मागे घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. सरकारने या नाण्यांचे उत्पादन थांबवले आहे. पण अद्याप रिझर्व्ह बँकेने अधिकृत घोषणा केलेली नाही. दरवर्षी किती नाण्यांची टांकसाळ करायची हे केंद्र सरकार ठरवते. यानंतर, सरकार रिझर्व्ह बँक ऑफ […]
समांतर क्रांती / ब्युरो रिपोर्ट मंगळवारी (१६) खानापूर पोलिस स्थानकाचे हेड कॉन्स्टेबल जयराम हमन्नावर यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर आता पुढचा नंबर कुणाचा? पोलिस खात्यातीलच ‘थ्री स्टार’ अधिकाऱ्याची उचलबांगडी होणार असल्याची खमंग चर्चा पोलिस खात्यात आहे. गेल्या कांही महिन्यांपासून खानापूर पोलिस स्थानक हद्दीत भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे. त्याचाच हा परिपाक आहे. तालुक्यातील सत्तापालट झाल्यानंतर पारदर्शक प्रशासनाची […]