समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर कारवारप्रमाणेच बेळगाव जिल्ह्यातील मराठीबहूल गावांमध्ये कन्नड शाळा सुरू करून कानडीकरणाचा वरवंटा फिरविण्याचा डाव कर्नाटक सरकारने आखला आहे. त्याची अमलबजावणी सुरू झाली असून बेळगाव ग्रामीणसह खानापूर तालुक्यातील मराठी गावांमध्ये कन्नड शाळा सुरू करण्याचा अद्यादेश शिक्षण खात्याने जारी केला आहे. बेळगाव तालुक्यातील सावगाव आणि बाची येथील मराठी शाळांच्या परिसरात कन्नड शाळा सुरू […]
समांतर क्रांती /खानापूर जमिनीच्या सर्वेक्षणाचा उच्च न्यायालयाचा आदेश असतानाही त्याची कार्यवाही करण्यास टाळाटाळ करणारे खानापूरचे तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांची तात्काळ बदली करण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने बजावला आहे. असोगा ता. खानापूर येथील सर्वे नंबर 108 मधील 2 एकर 20 गुंठे जमीनीच्या सर्वेक्षणासाठी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात 114086/2019 ही याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर […]
समांतर क्रांती / खानापूर विद्युत तारांचा स्पर्श होऊन दोन हत्ती दगावल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. यामुळे खानापूर तालुक्यातील वनविभागात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील सुळेगाळी गावाजवळ शेतवडीत मुक्तसंचार करणाऱ्या हत्तीवर काळाने घाला घातला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, गणपती गुरव यांच्या शेतात सौर कुंपण लावण्यात आले होते. त्यावर हेस्कॉमच्या वीज तारा तुटून पडल्याने अतिरिक्त […]
समांतर क्रांती / बेळगाव एकीकडे काळा दिन पाळण्यास परवानगी नाकरणाऱ्या जिल्हाप्रशासनाने मराठी भाषीकांच्या हक्कांची पायमल्ली चालविली आहे, तर दुसरीकडे बेळगाव महानगरपालिका आयुक्त आणि पोलिसांनी तुघलकी कारभार चालविला आहे. मनपाच्या कर्मचाऱ्यांनी मुठभर कन्नड गुंडांची मर्जी राखण्यासाठी शहरातील दुकानांच्या फलकांना काळे फासले. पोलिसांनी म.ए.समितीचे युवा नेते शुभम शेळके यांना तब्बल पाच लाखांचा दंड ठोठावून अकलेचे तारे तोडले […]
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर खानापूर तालुक्यात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. शेतीतील अवजारांपासून घरे फोडण्यापर्यंत आणि बसस्थानकावर प्रवाशांना लुटण्यापासून ते महामार्गावर वाटमारीपर्यंत चोरट्यांनी हैदोस मांडला असला तरी पोलिसांची कामगिरी मात्र अत्यंत सूमार आहे. नागरीक धास्तवाले असून पोलिसांच्या कार्यप्रणालीबद्दल संताप व्यक्त होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी एकाच रात्री तब्बल दहा घरांत चोरी करून चोरट्यांनी तब्बल ४५ […]
समांतर क्रांती / खानापूर हेस्कॉमकडून देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने शुक्रवारी (दि. ३१) खानापूर तालुक्यातील काही गावांमध्ये दुपारी १ ते ५ यावेळेत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. खानापूर वीज केंद्रात अचानक दुरुस्तीचे काम निघाल्यामुळे खानापूर शहरासह लैला शुगर्स, देवलत्ती, बिदरभावी, भंडरगाळी, गर्लगुंजी, तोपिनकट्टी, भंडरगाळी निडगल, दोड्डहोसुर, सन्नहोसूर, करंबळ, जळगा, कुप्पटगिरी, लोकोळी, लक्केबैल, […]
पणजी : अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम याच्या अमली पदार्थांच्या साम्राज्यावर अखेर मोठा घाव बसला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने रविवारी मध्यरात्री गोव्यात गुप्त कारवाई करत दाऊदचा विश्वासू साथीदार आणि मुंबईतील ड्रग्ज नेटवर्कचा किंगपिन दानिश चिकना याला जेरबंद केले.गेल्या काही वर्षांपासून त्याने गोव्यासह कर्नाटकात देखील ड्रगचे साम्राज्य विस्तारले होते. अर्पोरा (हडफडे) परिसरात राबवलेल्या या कारवाईदरम्यान […]
जोयडा : कारवार- गोवा सीमेवरील माजाळी तपासणी नाक्यावर तपासणी दरम्यान खासगी बसमध्ये पोलिसांना तब्बल १ कोटींची अवैध रोकड सापडली आहे. ही रोकड गोव्यातून बेंगळुरूकडे नेण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना मध्यरात्री उघडकीस आली. नियमित तपासणीदरम्यान पोलिसांनी बसमधील प्रवाशांच्या बॅगा तपासल्या असता, राजस्थान येथील कल्पेश कुमार नावाच्या प्रवाशाच्या बॅगेत मोठ्या प्रमाणात रोख […]
समांतर क्रांती / खानापूर शिंदोळी ग्राम पंचायतीच्या ग्राम विकास निधीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप माजी सदस्य विठ्ठल कौंदलकर यांनी केला आहे. तसे निवेदन सुद्धा त्यांनी पंचायत विकास अधिकाऱ्यांना सादर केले आहे. पंचायतीतून मंजूर होणारी विकास काम अध्यक्षांचे पती स्वतःच करीत असून केवळ एका कामगारवर ही कामे केली जात आहेत. परिणामी, एकतर काम वेळेत पूर्ण होत नाही, […]
समांतर क्रांती / नंदगड सीमावासियावर कर्नाटक सरकारने चालविलेल्या अन्यायाने कळस गाठला आहे. गेल्या 68 वर्षांपासून आपण न्याय्य हक्कासाठी लढत आहोत. आपला लढा न्याय मिळेपर्यंत निरंतर सुरु राहील. अन्यायाला आंदोलनाने उत्तर द्यावे लागेल, त्यासाठी मराठी भाषिकांनी काळ्यादिनी आपले व्यवहार बंद ठेऊन सरकारचा निषेध नोंदवावा, असे आवाहन आज नंदगड येथील जागृती फेरीदरम्यान खानापूर म. ए. समितीने केले. […]