समांतर क्रांती / बंगळूर आज बुधवारी (ता. 29) मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या श्री संगोळी रायण्णा विकास प्राधिकरणाच्या बैठक पार पडली. खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून विविध मागण्या केल्या. मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारून तात्काळ मागण्यांची पूर्तता करण्याची ग्वाही दिली. या प्रसंगी खानापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत विनंती करण्यात आली, आमदार विठ्ठल हलगेकर […]
जांबोटी: 1 नोव्हेंबर 1956 रोजी भाषावार प्रांत रचना करतेवेळी बेळगाव, कारवार, निपाणी,बीदर, मराठी बहूभाषिक भाग अन्यायाने कर्नाटक राज्यात डांबण्यात आला असून, गेल्या 68 वर्षापासून सीमा भागातील मराठी भाषिक 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पळून निषेध व्यक्त करतात.येतया शनिवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी मराठी भाषिकांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून, कडकडीत हरताळ पाळावा, असे आव्हान खानापूर […]
समांतर क्रांती / खानापूर झोपडीला आग लागल्याने संसारोपयोगी साहित्य भस्मसात झाल्याची घटना काल रविवारी (ता.२६) गुंजी येथे घडली. यामुळे भटक्या जमातीतील बाबू पोवार यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. बाबू पोवार यांच्यासह त्यांचे कुटुंबीय कामासाठी बाहेर गेल्यामुळे सुदैवाने जीवीतहानी टळली. मात्र, दैनंदिन गरजेच्या वस्तू आगीच्या भक्षस्थानी पडल्याने हे कुटुंब संकटात सापडले आहे. बाबू पोवार हे वानरमारी […]
समांतर क्रांती / खानापूर १ नोव्हेंबर काळादिन तालुक्यातील व्यापाऱ्यांनी कडकडीत हरताळ पाळण्याचे आवाहन खानापूर तालुका म. ए. समितीने केले आहे. आज झालेल्या समिती कार्यकारिणीच्या बैठकीत काळ्या दिनी सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन करून केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या सीमाप्रश्न सोडविण्याच्या दिरंगाई बाबत निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. बैठकीला समितीचे […]
समांतर क्रांती / बेळगाव Session in Belgaum in the first week of December. आपण मुख्यमंत्रत्र्यांशी चर्चा केली असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बेळगावातील सुवर्णसौधमध्ये हिवाळी अधिवेशन होणार असल्याची माहिती विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी हुबळी येथे शनिवारी (ता. २५) पत्रकारांना दिली. आधीच जिल्हा प्रशासनाने काळादिनाला परवानगी नाकरल्यामुळे बेळगावसह सीमाभागात नाराजी पसरली आहे, त्या हिवाळी अधिवेशन […]
समांतर क्रांती / खानापूर Youth who went for exercise drown in river? व्यायामासाठी गेलेला तरूण मलप्रभेत पोहण्यासाठी उतरल्यानंतर बुडाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्याचा शोध घेतला जात आहे. प्रथमेश रविंद्र पाटील (१८) असे या तरूणाचे नाव असून तो लोकोळी येथील आहे. काल शुक्रवारी सायंकाळी प्रथमेश नेहमीप्रमाणे मलप्रभा काठावर गेला होता. तो पोहत असतांना कांही […]
समांतर क्रांती / खानापूर एक नोव्हेंबर काळादिन नियोजनासंदर्भात चर्चा करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक उद्या रविवारी (ता. २६) सकाळी ठीक ११ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे बोलावण्यात आलेली आहे. १ नोव्हेंबर रोजी काळादिन पाळण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे, तरी या बैठकीला समस्त मराठी भाषीकांनी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन […]
समांतर क्रांती / खानापूर ‘जोयडा जात्यात, खानापूर सुपात’ या शिर्षकाखाली ‘समांतर क्रांती’ने भीमगड अभयारण्यातील गावांच्या स्थलांतराबाबत वृत्त प्रसिध्द केले होते. त्याची दखल अनेक पातळ्यांवर घेण्यात आली. आमगाव येथील ग्रामस्थांनी सोयी-सुविधा पुरविल्याशिवाय स्थलांतर करणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. तसेच खानापूर तालुका काँग्रेसकडूनही या वृत्ताची दखल घेण्यात आली असून काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट […]
समांतर क्रांती / खानापूर शाळेच्या आवारात एकाचा मृतदेह आढळून आल्याने काही काळ खळबळ माजली होती. पण, मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पालकांनी निःश्वास सोडला. ही घटना घडली रामनगर येथे. सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वाकला गेलेल्याना शाळेच्या मैदानावर मृतदेह दिसला. तातडीने नागरिकांनी याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी तात्काळ हालचाली करून मृतदेहाची ओळख पटविली. सदर व्यक्ती […]
समांतर क्रांती / लोंढा Five kg of ganja seized at Londa railway station; one arrested. लोंढा रेल्वे स्थानकावर पोलिसांनी मोठी कारवाई करीत पाच किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, मिळालेल्या खात्रीलायक माहितीवरून पोलिसांनी रेल्वेस्थानकावर अचानक कारवाई केली. यावेळी झारखंड येथील परशूराम मॅथ्यू याला अटक करून त्याच्याकडून […]