समांतर क्रांती / खानापूर शेतात काम करीत असतांना शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना भीमगड अभयारण्यातील गवाळी येथे आज शुक्रवारी (ता. २४) दुपारी घडली. या हल्ल्यात प्रकाश कृष्णा गुरव (५०) हा गंभीर जखमी झाले असून त्याना बेळगावला अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे. प्रकाश गुरव हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात शेतकाम करीत असतांना अचानक गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. […]
समांतर क्रांती / खानापूर Engineer dies after drowning in river after going to party मित्रांसमवेत पार्टीसाठी गेलेल्या तरूण आयटी अभियंत्याचा पांढरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना जोयडा तालुक्यातील चांदवाडीनजिक घडली. ईरशाद अहमद मुगुटसाब हुक्केरी (वय ३५, रा. दांडेली) असे त्याचे नाव असून रामनगर पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. इरशाद हा त्याच्या मित्रांसमवेत पार्टीसाठी पांढरी नदी […]
समांतर क्रांती / बंगळूर गेल्या वर्षभरापासून कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण आले असतांनाच आता मुख्यमंत्री सिध्दरामय्या राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचे विधान त्यांचे पुत्र यत्रिंद सिध्दरामय्या यांनी केले आहे. त्यामुळे राज्यभरात खळबळ माजली आहे. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना यतिंद्र यांनी मुख्यमंत्री सिध्दरामय्या हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या अंतीम टप्प्यात असून त्यांनी त्यांचे विश्वासू सहकारी बेळगावचे पालकमंत्री सतीश […]
समांतर क्रांती / खानापूर खानापूर तालुका कृषी उत्पन्न खरेदी-विक्री संघांच्या (मार्केटींग सोसायटी) अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड अविरोध करण्यात आली आहे. सोसायटीवर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माजी आमदार अरविंद पाटील यांनी निर्विवाद सत्ता स्थापन केली. त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचे १३ पैकी १० संचालकांची निवड अविरोध झाली होती, तर तीन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत त्यांच्याच पॅनेलच्या संचालकांनी बाजी मारली […]
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर सरकारच्या भपकेबाज योजनांमुळे नागरीक कसे अडचणीत येतात, याचा अनुभव सध्या जोयडा तालुक्यातील लोक घेत आहेत. तीच वेळ खानापूर तालुक्यावर सुध्दा येणार असली तरी नागरीक सरकारच्या भूलथापांना बळी पडतांना दिसत आहे. जोयडा जात्यात..वननिवासींचे अरण्यरुदन काळी व्याघ्र अभयारण्यातून जोयडा तालुक्यातील ६३० कुटुंबीयांचे स्थलांतर करण्यात आले आहे. अद्यापही ही प्रक्रिया सुरू आहे. स्थलांतरानंतर […]
जिल्हा मध्यवर्ती बँकेवर पाचव्यांदा निवड झाल्याबद्दल मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे सत्कार समांतर क्रांती / खानापूर तालुक्यातील तरूणांमध्ये विविध क्षेत्रात चमकण्याची क्षमता आहे. अलिकडे क्रीडा क्षेत्रात तालुक्यातील अनेक तरूण चमक दाखवित आहे. शिक्षण क्षेत्रात सुध्दा तरूणांनी ठसा उमटविला आहे. तालुक्यात अनेकजण कथा, कांदबऱ्या, वैचारिक लेख, कविता लिहितात. त्यांचा शोध घेतला गेला पाहिजे. त्यांना प्रोत्साहन मिळाले पाहीजे, असे […]
समांतर क्रांती / खानापूर दरवर्षी दांडेलीच्या जंगलातून येणाऱ्या हत्तीनी ऐन दिवाळी सणातच खानापूर तालुक्यात प्रवेश केला आहे. दोन हत्तींच्या कळपानी नागरगाळी वनपरिक्षेत्रात अक्षरश: उच्छांद मांडला आहे. चार हत्तींचा एका कळपाने गेल्या चार दिवसांपासून गोधोळी परिसरात ठाण मांडले आहे. तर पाच हत्ती असलेला दुसरा कळप करजगीपर्यंत येऊन पोहचला आहे. त्याची वाटचाल नंदगडच्या दिशेने सुरू आहे. दरवर्षी […]
समांतर क्रांती / खानापूर आजच्या प्रतिकूल परिस्थितीत समाजाचे प्रबोधन अत्यावश्यक आहे. त्याची कास मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानने धरली आहे, हे खानापूर तालुक्याच्या दृष्टीने अशादायक आहे. प्रबोधन दिवाळी अंक केवळ एक पुस्तक नाही, समाजाला सजक करण्याचा प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाचा उपक्रम वाखानन्याजोगा आहे. हा विचार प्रचार प्रसार करण्यासाठी समविचारी लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. ही गरज प्रतिष्ठान नक्कीच […]
समांतर क्रांती / खानापूर मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान संचलित प्रबोधनकार ठाकरे वाचनालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रबोधन दिवाळी अंकाचे प्रकाशन सोमवारी (ता. 20) वाचनालयात दुपारी 3 वाजता होणार आहे. तालुक्यातील विविध मान्यवरांच्या हस्ते या अंकाचे प्रकाशन होणार आहे. महाराष्ट्र, गोवा आणि खानापूरातील विचारवंतांचे लेख, कथा, परिसंवाद आणि वारीच्या कवितांचा खजिना असलेल्या या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाला तालुक्यातील मराठी […]
समांतर क्रांती /जोयडा महाराष्ट्र सरकारतर्फे रामनगर – जोयडामार्गे सुरू करण्यात आलेल्या पुणे–पिंपरी ते कारवार या नवीन बससेवेचे आज जोयडा येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. कारवारहून आलेल्या या बसचे पारंपरिक पद्धतीने पूजन व सजावट करण्यात आली. स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी व समाजसेवकांच्या उपस्थितीत बससेवेचा शुभारंभ झाला. यावेळी जोयडा तालुका काळी पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष विनय देसाई म्हणाले, […]