समांतर क्रांती / बेळगाव म. ए. समिती नेते नेताजी जाधव यांच्या अमृत महोत्सवी वाढसानिम्मित आयोजित कार्यक्रमाला आज गुरुवारी (ता. 16) महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते आमदार जयंतराव पाटील यांनी हजेरी लावली. त्यांनी यावेळी महाराष्ट्र सीमावासियांसोबत असल्याचे सांगतानाच कर्नाटकी अन्यायाबद्दल विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन तुमच्या मुख्यमंत्र्यांना समज द्या, अशी मागणी करू अशी […]
समांतर क्रांती / खानापूर खानापूर ते लोंढादरम्यानच्या महामार्गावर पुन्हा वाटमारीचे प्रकार घडत असल्याने प्रवाशांत घबराट पसरली आहे. काल मंगळवारी (ता. १४) दिवसाढवळ्या एका तरूणाला टोळक्याने पैशांची मागणी करीत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. सहा महिन्यांपूर्वी अशाच घटना या मार्गावर घडल्या होत्या. पुन्हा वाटमारीचे प्रकार वाढल्यामुळे गुंजी, लोंढा आणि रामनगर परिसरासह गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांत भितीचे […]
समांतर क्रांती / खानापूर सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना काल सोमवारी (ता.१३) घडली आहे. नंदगड भागातील सर्पदंशाची ही दुसरी घटना असून याबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ददोन महिन्यांपूर्वी नंदगडातील एका शाळकरी मुलाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला होता. तालुक्यातील हत्तरवाड येथील गणपती नारायण हलसकर (५२) हे शेतात काम करीत असतांना त्यांना सर्पदंश झाला होता. त्यांना […]
समांतर क्रांती / खानापूर Theft in ten houses in six villages of Khanapur taluka in one night खानापूर तालुक्यातील सावरगाळी, शिंपेवाडी, गुंजी, बरगाव, रामगुरवाडी आणि गणेबैलसह शहरातील दहा घरामध्ये एकाच रात्री चोरी झाल्याने खळबळ माजली आहे. या चोरीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला असून पोलिस खातेही चक्रावून गेले आहे. चोरीची पध्दत पाहता ही चोरी […]
समांतर क्रांती / खानापूर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या खानापूरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक निवडीत अखेर माजी आमदार अरविंद पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. त्यांची पाचव्यांदा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर निवड झाली असून यावेळी त्यांची अविरोध निवड झाली आहे. नुकताच माजी आमदार अरविंद पाटील यांनी नंदगड येथील मार्केटींग सोसायटीच्या निवडणुकीत त्यांच्या समर्थकांची अविरोध निवड करून […]
समांतर क्रांती / बंगळूर भांडूरा नाला वळवण्याच्या प्रकल्पाला केंद्र सरकारने आक्षेप घेतल्यानंतर कर्नाटक राज्य सरकारने प्रकल्पाच्या रकमेच्या ५ टक्के रक्कम (३२.८५ कोटी) वन्यजीव संवर्धनासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. भांडुरा नाला वळवण्याच्या प्रकल्पाचे क्षेत्र भीमगड वन्यजीव अभयारण्याच्या अधिकारक्षेत्रात नाही. तथापि, या भागात वाघ, बिबटे आणि दुर्मिळ झाडे आहेत. त्यांच्या सवधर्धनासाठी प्रादेशिक कार्यकारी समितीने (REC) राज्य सरकारला […]
समांतर क्रांती / बंगळूर जंगल व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी दाखवलेल्या साहसपूर्ण कामगिरीसाठी हुलेकल (ता. शिर्सी) वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल शिवानंद निंगाणी यांना २०२४ चे मुख्यमंत्री पदक प्राप्त झाले आहे. बंगळूर विधानसौधमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या, वनमंत्री ईश्वर खंड्रे व वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना मुख्यमंत्री पदक आणि प्रशस्तीपत्र बहाल करण्यात आले. जंगल आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी दिलेल्या वैशिष्ट्यपूर्णसेवेसाठी […]
समांतर क्रांती / खानापूर अल्पवयीन तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील देवलत्ती येथे घडली आहे. अश्विनी बसाप्पा कोलकार (वय १७) असे या तरूणीचे नाव असून खानापूर पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे. गुरूवारी अश्विनी हिने घराच्या अंगणातील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचे नंद्दिहळ्ळी येथील तरूणावर प्रेम होते. तो तरूण अश्विनीला त्रास देत […]
समांतर क्रांती / खानापूर खानापूरच्या माजी आमदार आणि अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव डॉ अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्याकडे संघटन सृजन अभियानांतर्गत उत्तराखंडनंतर आता तेलंगनाचीही जबाबदारी पक्षाने सोपविली आहे. पक्ष संघटनेमधील त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्याकडे यापूर्वीही अनेक राज्यात संघटना सक्षम करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुढील दहा दिवस त्या तेलंगणाच्या दौऱ्यावर असून त्या स्थानिक नेते आणि […]