
समांतर क्रांती / बेळगाव
शाळेतील पाण्याच्या टाकीत अज्ञातांनी किटकनाशक टाकल्याची घटना सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात ही घडली आहे. किटकनाशक मिश्रीत पाणी पिल्याने १२ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
आज सोमवारी (ता.१४) हुल्लीकट्टी शाळेत पाणी प्यालेल्या १२ विद्यार्थ्यांना चक्कर आणि उलट्या व्हायला सुरूवात झाल्याने तात्काळ त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. ईश्वर गडाद आणि जिल्हा शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ यांनी आधी रूग्णालयात आणि नंतर शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची त्यांनी चौकशी केली.
जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. गडाद यांनी सदर प्रकार हा पाण्यात किटकनाशक टाकल्याचे म्हटले आहे. यामुळे एकच खळबळ माजली आहे. शाळेतील पाण्याच्या टाकीत कुणी किटकनाशक टाकले? त्यांचे या प्रकारामागील प्रयोजन काय? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून पालकदेखील आक्रमक झाले आहेत.

शाळेजवळच अस्वलाचा वावर..खानापूर तालुक्यातील घटना..
समांतर क्रांती / खानापूर शालेत चक्क मुख्याध्यापकाच्या टेबलवरच सापाने ठिय्या मांडल्याची घटना गवाळी येथील शाळेत घडली होती. त्यानंतर शहरापासून आवघ्या १२ कि.मी. अंतरावरील गावातील शाळेच्या परिसरातच अस्वलाच्या वावराने खळबळ उडाली आहे. शिक्षकांनी अस्वलाच्या भितीने ‘तुमच्या मुलांना शाळेच्या वेळेतच पाठवा. वेळेपूर्वी पाठवू नका, तुम्ही स्वत: मुलांना शाळेत सोडा,’ असा संदेश मोबाईलवर पाठविला आहे. जंगली श्वापदांनी तालुक्याच्या […]