समांतर क्रांती / फोटो कॉर्नर
एक छायाचित्र हजारो शब्दांचे काम करते, असे म्हटले जाते. त्याची प्रचिती अनेक ठिकाणी येत असते. पावसात भीजत भाषण करणारे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि संसदेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांची ती कृती भाव खाऊन गेली.
अशीच घटना काल शनिवारी इटगी येथे पहावयास मिळाली. इटगीतील विद्यार्थी आणि पालकांनी धरणे आंदोलन छेडले होते. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतील काँग्रेसच्या सचिव तथा माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर या उपस्थित होत्या. त्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यात बसल्या होत्या. दरम्यान, पावसाची मोठी सर आली. त्यात सर्वजण भीजू लागले. पण, कुणीही जागचे हलले नाही.
डॉ. अंजली निंबाळकर या भिजत असल्याचे लक्षात येताच त्यांच्या बाजुला बसलेल्या एका विद्यार्थ्यांने त्यांच्या डोकीवर पुठ्याचा फलक धरला. यावेळी डा। निंबाळकरदेखील कांहीवेळ भावविवश झाल्याचे पहावयास मिळाले. ही घटना साधी-सरळ वाटत असली तरी विद्याथ्यर्ची ती कृती त्यांच्यातील संस्कार अधोरेखीत करते.
त्यामुले डॉ. निंबाळकर यांनी त्यांच्या सोशसल मिडिया प्लॅटफॉर्मवर हा फोटो टाकून कृतज्ञता व्यक्त केली आहे. असी संस्कारी मुले आपल्या तालुक्यात असल्याबदल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ‘मी कायम तुमच्या पाठिशी आहे. शिक्षणाच्या बाबतीत कोणतीही हयगय करणार नाही’ असेही त्यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.


खानापूरच्या माजी आमदारांबद्दल अपशब्द; आमदारांच्या दोन समर्थकांना पोलिस स्थानकाची हवा..
समांतर क्रांती / खानापूर माजी आमदारांबद्दल व्हाट्सॲप ग्रूपवर अपशब्द वापरल्याबद्दल दोघांना रात्रभर पोलिस स्थानकाची हवा खावी लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे बेताल वक्तव्य करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. विधान परिषदेचे आमदार चन्नराज हट्टीहोळ्ळी यांच्या नावे त्यांच्या समर्थकांचा व्हाट्सॲप ग्रूप आहे. त्या ग्रूपवर एका माजी अमदारांबद्दल अवमानकारक संदेश लिहिल्याने आमदार हट्टीहोळ्ळी यांचे समर्थक लोकोळी येथील संतोष पाटील […]