
समांतर क्रांती वृत्त
खानापूर तालुक्यातील रस्त्यांची चाळण झाली आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे आता खड्डे बुजविण्यासाठी ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांना श्रमदान करावे लागत असल्याने तालुक्यातील सत्ताधारी भाजप, राज्यातील सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर नामुष्की ओढवली आहे. नुकताच शहरातील पारिश्वाड रस्त्यावरील खड्डे भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुजविले. पण, त्यांचे जनसामान्यांतून कौतूक होण्याऐवजी नागरीकांतून त्यांच्याबद्दल किव व्यक्त केली जात आहे.

खानापूरात शहरांतर्गंत महामार्ग, रुमेवाडी नाका, पारिश्वाड क्रॉस, जांबोटी क्रॉस आणि नव्या बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर भले मोठे खड्डे पडले आहेत. परिणामी, प्रवाशांचे नाहक हाल होत आहेत. पावसाळ्यापूर्वी धुळीतून आणि आता पावसाळ्यात चिखलातून मार्गाक्रमण करावे लागत असल्याने प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पारिश्वाड रस्त्यावर शहरालगत मोठे खड्डे पडल्याने प्रवास जिकरीचा आणि धोक्याचा बनला असतांना बुधवारी (ता.९) रोजी भाजप कार्यकर्त्यांनी पाण्याने तुंबून राहिलेले खड्डे बुजविले. खड्ड्यांत माती टाकण्यात आल्याने प्रवाशांची तात्पूरती सोय झाली आहे. पण, खड्ड्यांची जागा चिखलाने घेतल्याने आगीतून फुफाट्यात अशी प्रवाशांची आवस्था झाली आहे. त्यामुळे भाजपच्या त्या कार्यकर्त्यांचे कौतूक होण्याऐवजी त्यांची किव केली जात आहे.
कौतूक नको, पण आरोप आवर..
तालुक्यात भाजपचे आमदार आहेत, पण भाजपच्या कार्यकर्त्यांवर श्रमदान करून लोकांना दिलासा द्यावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर नामुष्की ओढवली असून दुसऱ्या पक्षाचा आमदार असता तर याच कार्यकर्त्यांनी आंदोलने केली असती, अशी कोपरखळी निलावडे येथील सामाजिक कार्यकर्ते अर्जून कांबळे यांनी लगावला आहे. अशीच प्रतिक्रीया प्रवाशांतून व्यक्त होत असून आता तरी लोकप्रतिनिधी व विरोधी पक्षाचे नेते रस्त्यांच्या दूरावस्थेकडे लक्ष देतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर श्रमदान करून शाबासकी मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर कौतूक नको पण आरोप आवर असे म्हणण्याची वेळ आली आहे.


काजू चोरीप्रकरणी उचवडेच्या तरूणाला अटक
समांतर क्रांती वृत्त: बेळगाव मंडोळी येथील काजू फॅक्टरीतून २ हजार ४४९ किलो काजूची चोरी केल्याप्रकरणी खानापूर तालुक्यातील उचवडे येथील तरूण महादेव तुकाराम पाटील (वय ३०) याला बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ४२ पोती काजू आणि ट्रक (केए २२ सी ९३८७) यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. पाच दिवसांपूर्वी (ता.५) मंडोळी येथील बाळासाहेब […]