समांतर क्रांती / खानापूर
मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान संचलित प्रबोधनकार वाचनालयाला कॉ. किशोर ढमाले, प्रा. प्रतिमा परदेशी, डॉ. मंजुश्री पवार यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत पत्रकार विकास पाटील, पत्रकार सुहास हुद्दार, म.ए.समितीचे नेते विलास बेळगावकर उपस्थित होते.कॉ. किशोर ढमाळे आणि प्रा. प्रतिमा परदेशी यांना राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्कार मिळाल्याबद्दल वाचनालयाच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

सुरूवातीला प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर, सहसचिव प्रल्हाद मादार, खजिनदार ईश्वर बोबाटे, ग्रंथपाल चेतन लक्केबैलकर, सदस्य मऱ्याप्पा पाटील, हणमंत सुतार यांनी मान्यवरांना पुष्प आणि प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाने प्रसिध्द केलेला ‘प्रबोधन’ दिवाळी अंक देऊन सन्मामीत केले. प्रसंगी वाचनालयाच्यावतीने कॉ. किशोर ढमाळे यांना ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद- संघर्ष आणि संकल्प’ हे पुस्तक भेट देण्यात आले. तसेच लेखक प्रल्हाद मादार यांनी मूर्तीमंत कांदबरी भेट दिली.
प्रसंगी उपस्थितांनी खानापूर तालुक्यातील सत्यशोधक चळवळ आणि कम्युनिस्ट चळवळ जाणून घेतली. पुन्हा या चळवळी जिवंत झाल्या पाहिजेत. त्यासाठी चर्वांच्याच प्रयत्नांची गरज आहे, असे मत कॉ. ढमाळे यांनी व्यक्त केले. तसेच प्रतिष्ठान आणि वाचनालयाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी नागेश भोसले आणि नागेश कोलेकर उपस्थित होते.

देवधर्माची जळमटे दूर सारल्याशिवाय फुलेंना अभिप्रेत ज्ञानप्राप्ती होणार नाही : कॉ. ढमाळे
समांतर क्रांती / खानापूर सध्याचा काळ बहुजन समाजाच्या दृष्टीने अत्यंत कठीण असून बहुजनांच्या मेंदूचा ताबा अदृश्य शक्तीने घेतला आहे. शिक्षणाविषयी महात्मा फुल्यांनी जी संकल्पना मांडली ती केवळ ज्ञानापुरती मर्यादीत नव्हती. ज्ञानाच्या पलिकडे जाऊन समाजसुधारणेचा ध्यास घेणे, देवा-धर्माची जळमटे दूर करून गुलामगिरीतून मुक्त झाल्याशिवाय बहुजनांचा उद्धार होणार नाही, असे मत कॉ. किशोर ढमाळे यांनी मांडले. पुढील […]