
समांतर क्रांती / खानापूर
थोर विचारवंत, समाजसुधारक, साहित्यिक आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील आग्रणी पत्रकार केशव सीताराम ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. यनिमित्ताने येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान संचालित प्रबोधनकार ठाकरे वाचनालयात त्यांना अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर आणि खजिनदार ईश्वर बोबाटे यांनी प्रबोधनकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. सचिव वासुदेव यांनी प्रबोधनकरांच्या कार्याचा आढावा घेताना त्यांचे विचारच आता समाजाला तारतील, अशी भावना व्यक्त केली.
यावेळी सहसचिव प्रल्हाद मादार, ग्रंथापाल चेतन लक्केबैलकर, पत्रकार पिराजी कुऱ्हाडे यांच्यासह प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.


बेळगाव पीपल्स लोकसेवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची प्रबोधनकार ठाकरे वाचनालयला भेट
समांतर क्रांती / खानापूर पुणेस्थित खानापूरकरांच्या बेळगाव पीपल्स लोकसेवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान संचलित प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाला भेट दिली. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ताराम भेकणे यांनी छ. शिवराय आणि प्रबोधनकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. वाचनालयाची पाहणी करून फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. खानापूर येथे अश्याप्रकारे मराठीचे संवर्धन केले जाते, ही आश्वासक बाब आहे. […]