समांतर क्रांती / खानापूर
पुणेस्थित खानापूरकरांच्या बेळगाव पीपल्स लोकसेवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान संचलित प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाला भेट दिली.
यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ताराम भेकणे यांनी छ. शिवराय आणि प्रबोधनकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. वाचनालयाची पाहणी करून फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. खानापूर येथे अश्याप्रकारे मराठीचे संवर्धन केले जाते, ही आश्वासक बाब आहे. या कामी आम्ही सदैव प्रतिष्ठानच्या पाठीशी राहू अशी ग्वाही दत्ताराम भेकणे आणि सचिव प्रशांत गुंजीकर यांनी दिली.
यावेळी त्यांच्यासमवेत महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त पांडुरंग काकतकर, शंकर गुरव उपस्थित होते. प्रारंभी त्यांचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर आणि खजिनदार ईश्वर बोबाटे यांनी पुष्पगुछ देऊन स्वागत केले. यावेळी उपाध्यक्ष मऱ्याप्पा पाटील, सचिव वासुदेव चौगुले, सहसचिव प्रल्हाद मादार, हणमंत सुतार आदी उपस्थित होते.

लोंढा – रामनगर परिससरातून अल्पवयीन तरूणींची तस्करी?
समांतर क्रांती / विशेष चेतन लक्केबैलकर, खानापूर खानापूर आणि जोयडा तालुक्याच्या सीमावर्ती गावांमध्ये अल्पवयीन तरूणींना नोकरीचे आमिष दाखवून परराज्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोंढा पोलीस स्थानक हद्दीतील एका गावातील तब्बल ९ अल्पवयीन तरूणींना मागील काही आठवड्यांत परराज्यात पाठवण्यात आल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. रामनगर पोलीस स्थानक हद्दीतील काही गावातील मुलींचे पालक सुध्दा या अमिषाला […]