
समांतर क्रांती / खानापूर
निलावडे केंद्राच्या विभागीय प्रतिभा कारंजी स्पर्धा नागुर्डा मराठी शाळेत पार पडल्या. यावेळी झालेल्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष वासुदेव महाजन होते. या स्पर्धांमध्ये 18 शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
सुरूवातीला नागुर्डा शाळेचे मुख्याध्यापक आर. के. मादार यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. सरस्वती पूजन केल्यानंतर बोलतांना निलावडेच्या सीआरपी नाझनीन जमील पटेल म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षण खात्याकडून विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यासाठी शाळांच्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळतेच; पण पालकांनी सुध्दा त्यांच्या पाल्यांना अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरीत केले पाहिजे. त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्याचे हेच वय असते. त्यामुळे शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांना विविध कला जोपासण्यासाठी वाव द्यावा.
यावेळी व्यासपिठावर शाळा सुधारणा समितीच्या उपाध्यक्षा अनिता चापगावकर, माजी अध्यक्ष दुर्गेश महाजन, जेष्ठ नागरीक कृष्णाजी महाजन, मारूती कुलमुटकर यांच्यासह नागरीक, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन कबनाळी शाळेचे मुख्याध्यापक बापू दळवी यांनी केले तर आभार कृष्णा कौंदलकर यांनी मानले.
विजेते स्पर्धक :
स्पर्धा पहिली ते चौथी आणि पाचवी ते सातवी या दोन गटात झाल्या.
वेशभुषा : (पहिली ते चौथी)
स्मिता संजय तिनेकर (बांदेकरवाडा), योगिता मष्णू ओशीनकर (मुघवडे), संजना संजय रामनिचे (ओतोळी)
वेशभुषा : (पाचवी ते सातवी)
यशोधा ओशिनकर (मुघवडे), वैष्णवी मुतगेकर (ओतोळी), स्वरा सतिश चौगुले (काटगाळी)
धार्मिक पठण : पहिली ते चौथी
दर्शन नाईक (आंबोळी), मेघना गावडे (ओतोळी), अमुल्या पाऊसकर (नागुर्डा)
धार्मिक पठण पाचवी ते सातवी
तानाजी पाटील (आंबोळी), प्रशांत गावडे (मोदेकोप), लक्ष्मीकांत बरूकर (काटगाळी)
पद्य वाचन पाचवी ते सातवी
सोनाक्षी गावडे (कापोली), कविता नाईक (ओतोळी), नागराज वाणी (कांजळे)
प्रबंध लेखन : पाचवी ते सातवी
सान्वी कांबळे (निलावडे), वेदांत नाईक (कापोली), वैष्णवी चापगावकर (नागुर्डा)
कथाकथन : पहिली ते चौथी
लक्ष्मण पारवडकर (ना. वाडा), प्रतिक चापगावकर (मोदेकोप), वेदांत नाईक (आंबोळी)
कथाकथन : पाचवी ते सातवी
यश मुळीक (नागुर्डा), ज्ञानेश्वरी चिखलकर (मुखवडे), वैभवी दळवी (कबनाळी)
मातकाम : पहिली ते चौथी
सयाप्पा देसुरकर (ना. वाडा), स्वरांजली किनयेकर (कान्सुली), वेदांत नाईक (आंबोळी),
मातकाम : पाचवी ते सातवी
अक्षता कुंभार (नागुर्डा), वर्षा बेळगावकर (मोदेकोप), देवेंद्र गावडे (कापोली)
चित्रकला : पहिली ते चौथी
समर्थ जाधव (काटगाळी), आर्यन नवलुचे (कान्सुली), राजू गुरव (आल्लाळी)
चित्रकला : पाचवी ते सातवी
नैतिक पाटील (काटगाळी), काजल महाजन (नागुर्डा), शुभम किनयेकर (निलावडे)
मराठी कंठपाठ : पहिली ते चौथी
शिवण्या कांबळे (नागुर्डा), ममता शास्त्री (आंबोळी), वैभव मुलीमणी (कान्सुली)
मराठी कंठपाठ : पाचवी ते सातवी
मनस्वी हुंदरे ( ना. वाडा), अवधूत चिखलकर (मुघवडे), अंजली मोगरे (नागुर्डा)
कन्नड कंठपाठ : पहिली ते चौथी
शिवण्या भातकांडे (कांजळे), चनम्मा गावडे (ओतोळी), युवराज गावडडे ( मोदेकोप)
कन्नड कंठपाठ : पाचवी ते सातवी
वेदांत नाईक (कापोली), स्वप्नाली पाखरे (नागुर्डा), खुशी चापगावकर (मोदेकोप)
इंग्रजी कंठपाठ : पहिली ते चौथी
आर्यन नवलुचे (कान्सुली), शशिकांत गावडडे (कबनाळी), प्रतिक चापगावकर (मोदेकोप)
इंग्रजी कंठपाठ : पाचवी ते सातवी
श्रध्दा पारवडकर (कापोली), गुंजन येळ्ळूरकर (मोदेकोप), साईनाथ पाऊसकर (नागुर्डा)
भक्तीगीत : पहिली ते चौथी
सुहास मोटीचे (कान्सुली), आयुष देसुरकर ( नागुर्डा), अनुश्री मादार (कोकणवाडा)
भक्तीगीत : पाचवी ते सातवी
ज्ञानेश्वरी चिखलकर (मुघवडे), अदिती नाईक (कापोली), किर्ती देसाई (कोकणवाडा)
देशभक्ती गीत : पहिली ते चौथी
शिवण्या कांबळे (नागुर्डा), श्रेया पारवडकर (कापोली), आर्यन नवलुचे (कान्सुली)
देशभक्ती गीत : पाचवी ते सातवी
मनस्वी मसुरकर (काटगाळी), सोनाक्षी गावडे (कापोली), निलेश चोर्लेकर (अंबोळी)
अभिनय गीत : पहिली ते चौथी
ॠतुजा सलाम (नागुर्डा), स्वप्नाली गवाळकर (मुघवडे), श्रावणी गवसेकर (ना.वाडा)
अभिनय गीत : पाचवी ते सातवी
साक्षी बामणे (ओतोळी), अंजली मोगरे (नागुर्डा), क्रांती दळवी (कबनाळी)
आशुभाषण : पहिली ते चौथी
वेदांत उचगावकर (निलावडे), ॠतुजा सलाम (नागुर्डा), सुमित गुरव (मोदेकोप)
आशुभाषण : पाचवी ते सातवी
यश मुळीक (नागुर्डा), आदित्य गावे ( ओोतोळी)
मिमिक्री : पाचवी ते सातवी
स्वप्नाली पाखरे (नागुर्डा), सतिश गुरव (ओतोळी), वैष्णवी मुतगेकर (ओतोळी)
तालुकास्तरीय स्पर्धा उद्या..
तालुकास्तरीय प्रतिभा कारंजी स्पर्धांचे आयोजन उद्या गुरूवार दि. २७ रोजी करण्यात आले आहे. तरी विजेत्या स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे शिक्षण खात्याकडून कळविण्यात आले आहे.

तरूणींची तस्करी: रामनगर पोलिसांकडून चौकशी, खानापूर पोलिसांचे कानावर हात
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर अल्पवयीन तरूणींना परराज्यात नोकरीच्या आमिषाने पाठविणात आल्याच्या प्रकरणी रामनगर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. खानापूर पोलिसांनी मात्र या प्रकरणी कानावर हात ठेवले असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी महिला आयोगाकडे धाव घेण्याची तयारी कांही समाजसेवी संघटनांनी केली आहे. जोयडा आणि खानापूर तालुक्यातील सीमावर्ती भागातील पालकांना बक्कळ पगाराचे […]