
समांतर क्रांती / खानापूर
मुलगा सार्थक याच्या ६ व्या वाढदिवसानिमित्त शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष ईश्वर बोबाटे यांनी शाळेला प्रिंटर भेट दिले. दरवर्षी सार्थकच्या वाढदिवसानिमित्त ते अभिनव उपक्रम करतात. यंदा त्यांनी आपल्याच शाळेला प्रिंटरची भेट देऊन त्यांनी त्यांच्या उपक्रम कायम ठेवला आहे. शाळा सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी शाळेच्या नुतनीकरणासाठी प्रयत्न चालविले आहेत.
सार्थकचा वाढदिवस त्यांनी शाळेत साजरा केला. केक कापून आणि आरती ओवाळून औक्षण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक आणि शिक्षकांसह विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांनी सार्थक याला वाधदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

खानापूर-जांबोटी रस्त्यावर झाडाची फांदी कोसळून दुचाकीस्वार जखमी
समांतर क्रांती / खानापूर A bike rider was injured after a tree branch fell on the Khanapur-Jamboti road. खानापूर – जांबोटी रस्त्यावर शुभम् गार्डननजिक झाडाची फांदी कोसळून दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना आज गुरूवारी (ता. ५) घडली. मोहन पाटील (बरगाव) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव असून त्यांना घटनेनंतर तात्काळ येथील सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आहे. मोहन पाटील […]