
समांतर क्रांती /जोयडा
महाराष्ट्र सरकारतर्फे रामनगर – जोयडामार्गे सुरू करण्यात आलेल्या पुणे–पिंपरी ते कारवार या नवीन बससेवेचे आज जोयडा येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. कारवारहून आलेल्या या बसचे पारंपरिक पद्धतीने पूजन व सजावट करण्यात आली. स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी व समाजसेवकांच्या उपस्थितीत बससेवेचा शुभारंभ झाला.
यावेळी जोयडा तालुका काळी पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष विनय देसाई म्हणाले, ही बस जोयडा तालुक्यासाठी एक वरदान ठरणार आहे. बेळगाव येथून संध्याकाळी पाच वाजता सुटणारी ही बस आता जोयडा मार्गे धावणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पर्यटन, व्यापार आणि सेंद्रिय शेतीच्या दृष्टीने या सेवेचा मोठा फायदा होईल.जोयडा हे पर्यटनदृष्ट्या समृद्ध आणि सेंद्रिय शेतीसाठी प्रसिद्ध तालुका असून, या नवीन बसमार्गामुळे कारवार, पुणे, बेळगाव आणि जोयडा या भागांतील संपर्क अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे पर्यटन आणि स्थानिक व्यवसायांना चालना मिळण्याची अपेक्षा विनय देसाई यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्षा चंद्रमा मिराशी, सोसायटी अध्यक्ष दिवाकर देसाई, जोयडा सोसायटी संचालक संतोष सावंत, कुणबी समाज जिल्हा अध्यक्ष सुभाष गावडा, रफिक खाजी, मांबू कुंडलकर, दत्ता गावडा, दिवाकर कुंडलकर, भाळू मिराशी, सुभाष वेळीप, आनंद पोकळे, दत्ताराम देसाई, बाबुराव देसाई, वनिता नाईक, अरुण कमारेकर, विनोद देसाई, सतीश नाईक, किरण नाईक, तुकाराम मिराशी, प्रभाकर मिराशी आदी मान्यवर उपस्थित होते.स्थानिक नागरिकांनी या बससेवेच्या प्रारंभाचे स्वागत करत महाराष्ट्र सरकारचे आभार मानले. त्यांनी आशा व्यक्त केली की, ही सेवा कारवार- जोयडा –पुणे या प्रवासाला नवसंजीवनी देईल आणि परिसराच्या पर्यटन विकासाला गती देईल.

उद्या सोमवारी 'प्रबोधन' दिवाळी अंकाचे प्रकाशन
समांतर क्रांती / खानापूर मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान संचलित प्रबोधनकार ठाकरे वाचनालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रबोधन दिवाळी अंकाचे प्रकाशन सोमवारी (ता. 20) वाचनालयात दुपारी 3 वाजता होणार आहे. तालुक्यातील विविध मान्यवरांच्या हस्ते या अंकाचे प्रकाशन होणार आहे. महाराष्ट्र, गोवा आणि खानापूरातील विचारवंतांचे लेख, कथा, परिसंवाद आणि वारीच्या कवितांचा खजिना असलेल्या या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाला तालुक्यातील मराठी […]