समांतर क्रांती / खानापूर
खानापूर हा वैशिष्ट्यपूर्ण तालुका असून येथील रेल्वे स्थानकाला पायाभूत सुविधा आणि विकासासाठी रू. ११ कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी दिली. येथील रेल्वे स्थानकावरील विकासकामांचे भूमीपूजन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी, आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील आदींसह भाजपचे नेते-कार्यकर्ते उपस्थित होते.
रेल्वे स्थानकाशेजारी ३ कोटींच्या निधीतून भुयारी पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच रेल्वे स्थानकावर विविध सोयी पुरविल्या जाणार असल्याचे मंत्री व्ही. सोमण्णा म्हणाले. यावेळी त्यांनी हुबळी-दादर एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविला. ही रेल्वे एक मिनिटासाठी खानापूर रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.
यावेळी आमदार विठ्ठल यांनी वास्को-निजामुद्दीन आणि बेळगाव-बंगळूर एक्स्प्रेस खानापूर रेल्वे स्थानकावरर थांबवाव्यात. तसेच रेल्वे स्थानकासमोरील हनुमान मंदिराच्या विकासासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी केली. या मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याची ग्वाही यावेळी मंत्री व्ही. सोमण्णा यांनी दिली.


‘मराठा, कुणबी आणि मराठी’ची नोंद करा: आमदार हलगेकर
समांतर क्रांती / खानापूर २२ सप्टेबरपासून राज्यभरात जातनिहाय जनगणना सुरू होणार असून खानापूर तालुक्यातील मराठा समाजाने स्वत:ची माहिती देतांना जात मराठा. उपजात कुणबी आणि भाषा मराठी असा उल्लेख करण्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आवाहन केले आहे. आज येथील शिवस्मारकात सकल मराठा समाजाची बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जातनिहाय जनगणनेसाठी ६० […]