समांतर क्रांती / ब्यूरो न्यूज
शंभर वर्षातील सर्वात मोठे चंद्रग्रहण रविवारी रात्री पहायला मिळाले. भारतात तब्बल ३ तास २८ मिनिटे हे ग्रहण दिसले. हे पूर्ण चंद्रग्रहण ही २०२५ मधील सर्वात मोठी खगोलीय घटना ठरली आहे. ग्रहणादरम्यान चंद्राचा रंग काळा किंवा निळा नाही, तर लाल होता. त्यामुळे याला ‘ब्लड मून’ म्हटले गेले.
रविवारी रात्री ९.५८ वाजता चंद्रग्रहणाला सुरूवात झाली. सोमवारी पहाटे १.२६ वाजता ग्रहण संपले. या काळात चंद्राला पृथ्वीने पूर्णपणे झाकले होते. ११ ते १२.२२ वाजेपर्यंत भारतात चंद्र लालबुंद आणि तेजस्वी दिसत होता. नागरीकांसह खगोल शास्त्रज्ञांसाठी ही मोठी पर्वणी ठरल्यामुळे त्यांनी चंद्रग्रहण पाहण्यासाठी रात्र जागविली.


चोर्ला: लटकलेल्या आवस्थेत मृत्यूदेह, परीसरात खळबळ
समांतर क्रांती / कणकुंबी कणकुंबी वनपरिक्षेत्रात चोर्लाजवळ दाट जाडीत झाडावर लटकलेल्या आवस्थेतील मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहावर गुलाबी शर्ट आणि निळी पँट असून सदर व्यक्तीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काल रविवारी (ता.७) चोर्ला येथील गुराख्यांना झाडावर लटकणारा मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ जांबोटी पोलिस चौकीला याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह […]