नंदगड : कसबा नंदगड (ता. खानापूर) येथील वामन मन्नप्पा लोहार (वय 55) यांचे आज सोमवारी (ता.4) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, तीन भाऊ, पाच बहिणी, दोन मुलगे, विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते लाकडी कारागीर म्हणून प्रसिद्ध होते. कसबा नंदगड येथे सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंकार झाले. रक्षविसर्जन गुरुवारी (ता. 7) होणार आहे. कान्सूली मराठी शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद लोहार यांचे ते बंधू होत.

Crime Story: खानापूरला हदरवणाऱ्या खूनातील तिन्ही संशयीत आरोपी कारागृहात..
समांतर क्रांती / खानापूर तरुण अभियांत्यावर चाकू हल्ला करून खून करण्यात आल्याच्या घटनेतील तिन्ही संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी बजावल्याने त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. रविवारी (ता. 3) गांधीनगर -खानापूर येथे अभियंता सुरेश उर्फ रमेश तिमाप्पा बंडीवड्डर (32) याचा निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी मुख्य संशयीत आरोपी यल्लाप्पा शांताराम बंडीवड्डर (62), त्याची पत्नी […]