
खानापूर: तिओली (सध्या राहणार हिंदू नगर-खानापूर) येथील रहिवाशी व विमा प्रतिनिधी पांडुरंग शांताराम हेब्बाळकर (वय ५५) यांचे आज (ता. ०४) सकाळी ११ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. आज सायंकाळी पाच वाजता तिओली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, चिरंजीव, कन्या, भाऊ व वहिनी असा परिवार आहे. ते भाजपचे युवानेते व सामाजिक कार्यकर्ते किशोर हेब्बाळकर यांचे वडील होत.

गर्लगुंजीत नेम्मदी केंद्र सुरू करा
समांतर क्रांती / खानापूर गर्लगुंजीसह इदलहोंड, निट्टूर, बरगाव ग्राम पंचायत हद्दीतील शेकडो गावातील नागरिक, विद्यार्थ्यांना त्यांच्या शासकीय कामकाजासाठी जांबोटीला जावे लागते. त्यासाठी सुमारे २५ कि.मी.चा प्रवास करावा लागतो. त्यातही सदर काम एका फेरीत झाले नाही तर संबंधीतांची परवड होते. करिता, गर्लगुंजी येथे नेम्मदी केंद्र सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी महसूल मंत्री कृष्णा भैरेगौडा यांच्याकडे […]