
समांतर क्रांती / खानापूर
बैलहोंगल येथे युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहन व शपथ विधी सोहळा जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळ्ळी आणि महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी खानापूर ग्रामीण युवा काँग्रेस अध्यक्ष साईश सुतार यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी युवा काँग्रेसचे राज्य सचीव राहूल जारकीहोळ्ळी, सौदत्ती तालुक्याचे आमदार विश्वास वैद्य, बेळगाव जिल्हाध्यक्ष कार्तिक पाटील, मृणाल हेब्बाळकर आदींसह युवा काँग्रेसचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसंगी नुतन युवा काँग्रेस पदाधिकारी आणि सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. यावेळी पक्ष संघटनेसाठी युवा पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत काँग्रेसचे हात बळकट करण्याचे आवाहन पालकमंत्री सतीश जारकीहोळ्ळी यांनी केले.
साईश सुतार यांचे अभिनंदन
खानापूर तालुका युवा काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पालकमंत्री सतीश जारकीहोळ्ळी आणि महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी साईश सुतार यांचे अभिनंदने केले. तसेच खानापूर तालुक्यात युवकांचे संघटन करून पक्षाला उभारी देण्याबाबत मार्गदर्शन केले. साईश यांचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.

गर्लगूंजी ग्रा. पं. सदस्य प्रसाद पाटील यांच्या प्रयत्नांना यश; के.एल.ई. हॉस्पीटल घेणार पाच गावे दत्तक
समांतर क्रांती / खानापूर वडगाव- बेळगाव येथील के.एल.ई.चे शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत देसाई आणि गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्यात झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर गर्लगूंजी, निट्टुर, तोपिनकट्टी, बरगाव, बैलूर या गावांना नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून दत्तक घेतले जाणार आहे. प्रसाद पाटील यांनी यासाठी प्रयत्न केले. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याने त्यांचे या […]