समांतर क्रांती / बेळगाव
Session in Belgaum in the first week of December. आपण मुख्यमंत्रत्र्यांशी चर्चा केली असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बेळगावातील सुवर्णसौधमध्ये हिवाळी अधिवेशन होणार असल्याची माहिती विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी हुबळी येथे शनिवारी (ता. २५) पत्रकारांना दिली. आधीच जिल्हा प्रशासनाने काळादिनाला परवानगी नाकरल्यामुळे बेळगावसह सीमाभागात नाराजी पसरली आहे, त्या हिवाळी अधिवेशन घेण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयामुळे आगडोंब उसळण्याची शक्यता आहे.
उत्तर कर्नाटकातील आमदार विकासावर कमी बोलतात. त्यांना केवळ प्रादेशिक राजकारणात रस आहे. उत्तर कर्नाटकाच्या विकासावर चर्चा व्हावी, यासाठी ८ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन भरविले जाणार असल्याचे सभापती बसवराज होरट्टी यांनी म्हटले आहे. आता या अधिवेशनात बेळगावच्या विकासावर चर्चा होईल, पण मराठी भाषीकांना नागविले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समिती नेहमीप्रमाणे महामेळावा भरवून अधिवेशनला प्रत्युत्तर देणार का याकडे लक्ष लागले आहे.
२००६ पासून बेळगावात कर्नाटक सरकारचे अधिवेशन भरविले जात आहे. पण, हे अधिवेशन मंत्री आणि आमदारांसाठी यात्रा, सहल आणि विरंगुळाच ठरत आहे. प्रत्यक्षात हा केवळ मराठी माणसाच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याने मराठी भाषीकांनी आजवर अधिवेशनला विरोध केला आहे. यावेळीदेखील महामेळाव्याच्या माध्यमातून अधिवेशनाला विरोध केला जाणार का? समितीची भूमिका काय असणार? याकडे मराठी भाषीकांसह जिल्हा प्रशासनाचे लक्ष लागून राहिले आहे.

काळ्यादिनी कडकडीत हरताळ पाळा : खानापूर म. ए. समितीचे आवाहन
समांतर क्रांती / खानापूर १ नोव्हेंबर काळादिन तालुक्यातील व्यापाऱ्यांनी कडकडीत हरताळ पाळण्याचे आवाहन खानापूर तालुका म. ए. समितीने केले आहे. आज झालेल्या समिती कार्यकारिणीच्या बैठकीत काळ्या दिनी सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन करून केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या सीमाप्रश्न सोडविण्याच्या दिरंगाई बाबत निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. बैठकीला समितीचे […]