
समांतर क्रांती / बंगळूर
कर्नाटकात खळबळ उडवून दिलेल्या सेक्स स्कँडलप्रकरणी माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांचे नातू आणि माजी खासदार प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ३२ महिलांचे लैंगीक शोत्रण केल्याचा आरोप त्याच्यावर होता. लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात काल शुक्रवारी (ता.०१) रोषारोप सिध्द झाला होता. त्यानंतर आज न्यायालयाने शिक्षा सुनावली. यावेळी प्रज्वल याने डोळ्यात पाणी आणून आपली शिक्षा कमी करावी, अशी विनंती न्यायालयाला केली. Sex scandal: Former Prime Minister Dadegawda’s grandson sentenced to life imprisonment
बंगळूरमधील ३२ महिलांचे लैंगिक शोत्रण केल्याचा आरोप प्रज्वल याच्यावर आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात घरकाम करणाऱ्या महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात त्याला आज शिक्षा सुनावण्यात आली असून अजून तीन प्रकरणे प्रलंबीत आहेत. त्याला जन्मठेप आणि पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
शिक्षा सुनावल्यानंतर प्रज्वलला तुम्हाला काही बोलायचे आहे का? असे न्यायाधिशांनी विचारले असता, आपल्या शिक्षेत कपात करावी. मी गेल्या सहा महिन्यांपासून कारागृहात आहे, असे सांगतांना त्याला रडू कोसळले. प्रज्वलला या शिक्षेला उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा आहे. पण, उच्च न्यायालयानेही शिक्षा कायम ठेवल्यास सर्वोच्च न्यायालयाशिवाय पर्याय नाही. सर्वोच्च न्यायालयाने सुध्दा शिक्षा कायम ठेवल्यास मात्र दिलेली शिक्षा भोगावीच लागणार आहे. माजी पंतप्रधानांचा नातू आणि माजी खासदाराला जन्मठेप झाल्याने खळबळ उडाली आहे.


चिक्कहट्टीहोळीत उमेदवारलाच पळविले ; डीसीसीची रंगीत तालीम
समांतर क्रांती / खानापूर बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीची रंगीत तालिम आज चिक्कहट्टीहोळी येथे दिसून आली. काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराला विरोधकांनी पळविल्याचा प्रकार घडला असून निवडणूक भयमुक्त होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सत्तेच्या आडून दडपशाही चालविली जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्याच विधान परिषदेतील आमदारांच्या समर्थकांनी उमेदवार पळविण्याचा प्रकार घडला […]