समांतर क्रांती / खानापूर
सध्याचा काळ बहुजन समाजाच्या दृष्टीने अत्यंत कठीण असून बहुजनांच्या मेंदूचा ताबा अदृश्य शक्तीने घेतला आहे. शिक्षणाविषयी महात्मा फुल्यांनी जी संकल्पना मांडली ती केवळ ज्ञानापुरती मर्यादीत नव्हती. ज्ञानाच्या पलिकडे जाऊन समाजसुधारणेचा ध्यास घेणे, देवा-धर्माची जळमटे दूर करून गुलामगिरीतून मुक्त झाल्याशिवाय बहुजनांचा उद्धार होणार नाही, असे मत कॉ. किशोर ढमाळे यांनी मांडले.
पुढील बोलतांना, भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल, संस्कृती लोप पावली तर समाजाचची अवनती अटळ आहे. त्यासाठी आधी भाषा टिकली पाहिजे, यासाठी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आग्रही होते. आता हिंदी भाषा लादून संस्कृतीच संपविण्याचा घाट घातला जात आहे. ही धोक्याची घंटा आहे, असे मत त्यांनी यावेळी मांडले.
येथील शिवस्मारकातील व्ही. वाय. चव्हाण सभागृहात राष्ट्रविरकार शामराव देसाई पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक विचारवंत जयसिंगराव पवार होते. यावेळी कॉ. किशोर ढमाळे आणि सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्त्या प्रा. प्रतिमा परदेशी यांना संयुक्तपणे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलतांना प्रा. प्रतिमा परदेशी म्हणाल्या, या पुरस्काराने जबाबदारी वाढवली आहे. स्त्रिला कमी लेखण ही पुरूषसत्ताक मानसिकता अजुनही आहे. पण, याच स्त्रीने अनेक समाजसुधारकांना बिकट काळात अन्न-पाणी देऊन चळवळी आणि लढे जिवंत ठेवले. सध्याच्या स्त्री समोर बिकट काळ आहे. स्त्रीला सन्मानाची वागणूक मिळण्याकरता स्त्री शिकली पाहिजे. ती सक्षम झाली पाहिजे.
विद्या मिळवल्याशिवाय बहुजनांचा उद्धार होणार नाही, म्हणूनच अज्ञान घालवण्याकरता महात्मा फुले यांनी समाजाचे प्रबोधन शिक्षणाच्या माध्यमातून केले. गुरुवर्य शामराव देसाई यांनी हेच कार्य पुढे सुरु ठेवले. त्यांच्या विचारांचे विस्मरण होऊ नये, म्हणून त्यांच्या नावाने पुरस्कार जातो, असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी मांडले.
प्रारंभी प्रास्ताविक ॲड. राजाभाऊ पाटील यांनी केले. डॉ. मंजुषा पवार यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला. गुरुवर्य शामराव देसाई पुरस्काराचे वितरण अध्यक्ष डॉ.जयसिंगराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. २५ हजार रुपये रोख, घोंगडी, ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार समितीचे प्राचार्य अनंतराव देसाई, प्रकाश मरगाळे, शिवाजी देसाई आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्राचार्य आनंद मेणसे यांनी सुत्र संचालन केले. तर माजी आमदार दिगंबर पाटील यांनी आभार मानले.

शेतमजुराला ट्रॅक्टरने ठोकरले, डोकीवरून चाक गेल्याने जागीच ठार
समांतर क्रांती / खानापूर शेतकाम आटोपून घरी परतणाऱ्या शेतमजुराला ट्रॅक्टरने मागून जोराची धडक दिली. त्यानंतर कोसळलेल्या शेतमजुराच्या डोकीवरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक ट्रॅक्टर तेथेच सोडून पसार झाला. ही घटना लिंगनमठजवळील परिवार ढाब्यासमोर घडली. नागाप्पा रामचंद्र निलजकर (५५, रा. लिंगनमठ) असे मृताचे नाव आहे. नागाप्पा हे सायंकाळी शेतकाम आटोपून घरी निघाले होते. […]