
समांतर क्रांती / खानापूर
भीमगड अभयारण्यातील गवाळी या दुर्गम गावातील मराठी शाळेत अनेक प्रयोगशील उपक्रम राबवून शाळेला प्रकाशझोतात आणणे, ही खरंतर कसरतच आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुख्याध्यापक शामराव राजाराम जाधव यांनी हे शीवधणुष्य पेलत ही किमया साधली. त्याची दखल घेत शामराव जाधव यांना यंदाचा शिक्षण खात्याचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
मुख्याध्यापक शामराव जाधव हे शिक्षकी पेशात आल्यापासून म्हणजे २००४ पासून गवाळी शाळेत कार्यरत आहेत. पूर्वी शाळेचे पाचवीपर्यंत वर्ग एकाच खोलीत चालायचे, जाधव यांच्या प्रयत्नातून सातवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले असून आता चार वर्गखोल्या आहेत. त्यांच्या प्रयत्नातून या शाळेच्या विद्यार्थ्यांनी बालवैज्ञानिक स्पर्धा (इनस्पायर ॲवॉर्ड मध्ये) राज्य पातळीवर स्पर्धेत सहभाग, जिल्हास्तरावर शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत दुसरा क्रमांक, व्हॉलीबॉल स्पर्धेत झोनल लेवलमध्ये प्रथम क्रमांक, शाळेचे अनेक विद्यार्थी अर्कीटेक्चर म्हणुन निमसरकारी पदावर कार्यरत आहेत.श्री. जाधव हे २००७ पासून मुलींना दहावीपर्यंत शिक्षण मिळावे, यासाठी पाठपुरावा करीत आहेत.
यापूर्वी श्री. जाधव यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना कर्नाटक राज्य अल्पसंख्याक शाळा संघ, लायन्स क्लब बेळगाव, जामगांव येथे आयोजित मराठा मंडळ महाविद्यालयाच्या भीमगड निसर्ग साहित्य संमेलनात त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे. तसेच विश्व भारती कला क्रीडा संघटना बेळगाव यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला आहे. मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान , खानापूर यांच्यावतीने गवाळी शाळेला प्रयोगशील शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पहिल्यांदाच त्यांना शिक्षण खात्याचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.


सरकाराचा पांढरा हत्ती: सुवर्ण विधान सौधचे १.१० कोटींचे वीजबिल थकले, हेस्कॉमने पाठविली नोटीस
समांतर क्रांती / संडे स्पेशल सीमावासीय मराठी भाषीकांना डिवचण्यासाठी आटापीटा करून उभारण्यात आलेल्या हलगा येथील सुवर्णसौधचे वीजबिल भरण्यास सरकार असमर्थ असल्याचे स्पष्ट झाले आहे. तब्बल १.१० कोटींचे सुवर्णसौधचे वीजबिल थकले असून हेस्कॉमने सार्वजनिक बांधकाम खात्याला नोटीस पाठवून वीज पुरवठा खंडीत करण्याचा इशारा दिला आहे. बेळगावच्या मराठी भागावर हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकारने हलगा येथे रू. ३९४ […]