
समांतर क्रांती / बेळगाव
Shocking: Poison in school water tank; Sri Ram Sena president’s monstrous conspiracy राक्षसी प्रवृत्तीच्या त्रिकुटाने शाळेतील पाण्याच्या टाकीत विष मिसळल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकसि आले आहे. श्रीराम सेना या संघटनेचा तालुकाध्यक्षच या कटाचा म्होरक्या असल्याचे निष्पन्न झाल्याने बेळगाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात खळबळ माजली आहे. दुसऱ्या धर्मातील मुख्याध्यापिकेची बदली करण्यासाठी हा कट रचल्याचे या राक्षसी प्रवृत्तीच्या त्रिकुटांने कबुल केले असून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली असल्याची माहिती काल शनिवारी (ता.२) जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.
१५ दिवसांपूर्वी सौंदत्ती तालुक्यातील हुलकट्टी गावात शाळेच्या आवारातील पाण्याच्या टाकीतील दुषीत पाणी पिल्याने आकरा विद्यार्थी अत्यवस्थ झाले होते. त्यांच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर केवळ सुदैवाने हे विद्यार्थी बचावले होते. १४ जुलै रोजी घडलेल्या या घटनेचा तपास जिल्हा पोलिसांनी मोठ्या सिसताफीने लावत संशयीत आरोपींचा बुरखा फाडला.

याबाबत जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिलेली अधिक माहिती अशी, हुलीकट्टी सरकारी शाळेत अन्य धर्मीय मुख्याध्यापक आहेत. त्यांची बदली करण्याच्या हेतूने श्रीराम सेनेचा सौंदत्ती तालुकाध्यक्ष सागर सक्रप्पा पाटील (वय २३), कृष्णा यमन्नाप्पा मादर (वय २६) व नागणगौडा बसाप्पा पाटील (वय २५) यांनी टाकीत विष टाकण्याचा कट रचला. यापैकी कृष्णा मादर याचे अन्य जातीतील मुलीशी प्रेम प्रकरण होते. त्याचा बोलबाला करण्याची धमकी देत त्याला या कटात सागर याने सामिल करून घेतले.
कृष्णा याने शाळेतील एका मुलाला कुरकुरे पाकीट, चॉकलेट आणि ५०० रुपये देऊन एक बॉटलमधील द्रव पाण्याच्या टाकीत टाकण्यास सांगितले. त्या मुलाने या बॉटलमध्ये काय आहे, असे विचारले असता त्यात ज्यूस असल्याचे सांगण्यात आले. त्या विद्यार्थ्यांने विषाची बाटली पाण्याच्या टाकीत रिकामी केली. पण, खाली बाटली तेथेच टाकली. त्यावरूनच या कटाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश मिळाले.
त्या तिघांना अटक करून चौकशी केल्यानंतर त्यांनी दसर कटाची सविसस्तर माहिती दिली. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मुख्यध्यापकाच्या बदलीसाठी विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या या त्रिकुटाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पालकांतून होत आहे.
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत संताप व्यक्त केला आहे. केवळ जाती – धर्मासाठी विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार निंदनीय असल्याचे मत त्यांनी एका ट्वीटमध्ये केले आहे.


बैठकीतच चाकूहल्ला; खानापुरातील घटनेने खळबळ
समांतर क्रांती / खानापूर भांडण सोडविण्यासाठी चाललेल्या बैठकीतच एकावर चाकूहल्ला करण्यात आल्याची घटना शहरालगतच्या गांधीनगर येथे घडली आहे. जखमीला गंभीर आवस्थेत बेळगावला उपचारांसाठी रवाना करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. चाकू हल्ल्या मागचे निश्चित कारण व पार्श्वभूमी समजू शकली नाही. पोलिस घटनास्थळी पोहचले असून माहिती घेतली जात आहे. या प्रकरणाला अनैतिक संबंधांची किनार […]