
समांतर क्रांती / खानापूर
खानापूरसह रामनगर पोलिस स्थानकात १६ हून अधिक गुन्हे दाखल असलेला गुंड प्रविण सुधीर (रा. रामनगर) याच्यावर सोमवारी पोलिसांनी गोळीबार केला. त्यात तो जखमी झाला आहे. तसेच यल्लापूर पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस निरीक्षक व तीन पोलिस कर्मचारी सुध्दा या घटनेत जखमी झाले आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी, रामनगर येथील गुंड प्रविण सुधीर याला काल सोमवारी (ता. १४) हल्याळ रस्त्यावरील कन्नेगिरी येथे अटक करण्यात आली होती. त्याला यल्लापूरला नेत असतांना त्यांने पोलिसांवर हल्ला केला. बचावासाठी पोलिसांनी त्याच्या पायांवर गोळीबार केल्याने तो जखमी झाला. यामध्ये सहायक पोलिस निरीक्षकासह तीन पोलिस कर्मचारी सुध्दा जखमी झाले. त्यांना तातडीने यल्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
प्रविण सुधीर या गुंडावर खानापूर आणि रामनगर पोलिसात खून, खूनाचा प्रयत्न, मारहाण, ॲट्रॉसिटी तसेच चोरीचे १६ हून अधिक गुन्हे नोंद आहेत. निवडणुकीच्या काळात त्याला सहा महिने तडीपार करण्यात आले होते. त्यानंतरही त्याचे कारनामे सुरूच होते. अलिकडेच त्यांने रामनगर येथील एका पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला होता. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती. सध्या तो जामिनावर सुटला होता.

गोकर्ण: जंगलातच जन्मल्या मुली, पण मुलींचा बाप कोण; ‘त्या’ रशियन महिलेबाबत गुढ वाढले
समांतर क्रांती / गोकर्ण गोकर्ण येथील रामतीर्थ डोंगरावरील गुहेतआढळलेली महिला नीना कुटीना हिच्याबद्दलचे गुढ दिवसेदिवस वाढत चालले आहे. आठ वर्षे ती त्या भयावह गुहेत कशी राहिली, तीचा उदरनिर्वाह कसा चालत होता, त्यासाठीचा खर्च कसा केला जायचा, यासह तीला जर सहा आणि चार वर्षांच्या मुली असतील आणि त्यांचा जन्म त्या गुहेतच झाला असेल तर त्या मुलींचा […]