
समांतर क्रांती / बंगळूर
गेल्या वर्षभरापासून कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण आले असतांनाच आता मुख्यमंत्री सिध्दरामय्या राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचे विधान त्यांचे पुत्र यत्रिंद सिध्दरामय्या यांनी केले आहे. त्यामुळे राज्यभरात खळबळ माजली आहे.
प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना यतिंद्र यांनी मुख्यमंत्री सिध्दरामय्या हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या अंतीम टप्प्यात असून त्यांनी त्यांचे विश्वासू सहकारी बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळ्ळी यांचे मार्गदर्शक बनावे, असे म्हटले आहे. त्यामुळे नेतृत्व बदलाच्या शर्यतीत जारकीहोळ्ळी असणार हे स्पष्ट झाले आहे.
नुकताच मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता त्यांच्याच पुत्रांनी त्यांच्या निवृत्तीबद्दल विधान केल्यामुळे आणि जारकीहोळ्ळी यांचे नाव घेतल्यामुळे काँग्रेसमधील गटबाजीदेखील यानिमित्ताने समोर आली आहे. राजकीय समिक्षकांच्या मते यत्रींद्र यांचे हे विधान केवळ भावनिक नसून हा सुनियोजीत राजकीय डावपेच असल्याचे म्हटले जात आहे. डी.के. शिवकुमार यांना काटशह देण्याचा हेतू यामागे असू शकतो.

नदीत बुडून पार्टीसाठी गेलेल्या अभियंत्याचा मृत्यू
समांतर क्रांती / खानापूर Engineer dies after drowning in river after going to party मित्रांसमवेत पार्टीसाठी गेलेल्या तरूण आयटी अभियंत्याचा पांढरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना जोयडा तालुक्यातील चांदवाडीनजिक घडली. ईरशाद अहमद मुगुटसाब हुक्केरी (वय ३५, रा. दांडेली) असे त्याचे नाव असून रामनगर पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. इरशाद हा त्याच्या मित्रांसमवेत पार्टीसाठी पांढरी नदी […]