
समांतर क्रांती / बंगळूर
शाळा शिक्षण आणि साक्षरता खात्याच्या प्रौढ शिक्षण परीक्षा मंडळाच्या कायद्यात बदल करण्यात आला असून यापुढे दहावीच्या विद्यार्थ्यांनी ६२५ पैकी २०६ म्हणजेच केवळ ३३ टक्के गुण मिळविल्यास उत्तीर्ण केले जाणार आहे. यापूर्वी किमान ३५ टक्के गुण मिळविणे आवश्यक होते. काल गुरूवारी (ता.२४) याबाबत परीक्षा मंडळाने निर्णय घेतला असून १५ दिवसात यावर आक्षेप नोंदवावेत. हरकती नोंदविल्या न गेल्यास या निर्णयाचे कायद्यात रुपांतर केले जाईल, असे परीक्षा मंडळाने कळविले आहे.
एकंदरच, शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची गरज असतांना परीक्षा मंडळाचा हा निर्णय वादाचा विषय ठरण्याची शक्यता अधिक आहे. गेल्या वर्षीच्या दहावीच्या परीक्षा निकालात राज्याची मोठी घसरण दिसून आली आहे. पण, त्यासाठी शैक्षणिक दर्जा सुधारण्याऐवजी विद्यार्थ्यांना अभ्यासापासून पारावृत्त करण्याचाच प्रयत्न परीक्षा मंडळाने चालविला असल्याचे जाणकारांचे मत आहे.


गोव्याची ‘वाट’ खडतर; आता तरी काम करा लवकर..
समांतर क्रांती / खानापूर बेळगाव – पणजी महामार्ग आणि चोर्ला राज्य महामार्गावरून वाहतूक करणे, वाहन चालकांच्या जीवावर बेतत आहे. अनमोड घाटात दरड कोसळून महामार्ग खचला आहे, तर चोर्ला रस्त्यावर जांबोटीनजीक कुसमळी पुलाचे काम अर्धवट आहे. दोन्ही रस्त्यावरील वाहतूक धोक्याची बनली असतांना अवजड वाहन चालकांनी आक्रस्ताळेपणा चालविला आहे. याकडे महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने साफ […]